बेगंळुरू : ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील विजय आणि गेल्या वर्षी न्यूझीलंडमधील चांगल्या कामगिरीमुळे आमच्या संघाचा २४ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दौºयासाठी आत्मविश्वास उंचावला आहे. आमचे लक्ष्य न्यूझीलंड संघावर पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवण्याचे राहील,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सांगितले. भारतीय संघ सोमवारी रात्री न्यूझीलंडसाठी रवाना झाला.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात पाच टी२०, तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामने खेळणार आहे. गेल्या वर्षी भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय सामन्यांमध्ये ४-१ ने पराभूत केले होते, पण टी२० मालिका १-२ ने गमावली होती.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसºया व अंतिम एकदिवसीय सामन्यात सात गडी राखून विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला, ‘न्यूझीलंडमधील गेल्या वर्षीच्या कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आम्हाला कसे खेळायचे आहे, याबाबत आम्ही सकारात्मक होतो. आम्हाला काय करायचे आहे, याची रणनीती होती. विदेशात खेळताना तुम्ही यजमान संघावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले, तर तुम्ही खेळाचा आनंद घेऊ शकता. यजमान संघाला असे वाटते की, मायदेशात खेळताना जिंकायलाच हवे. त्यामुळे तुम्ही जर सर्वोत्तम कामगिरी केली, तर तुम्ही त्यांच्यावर दडपण आणू शकता. आम्ही याच निर्धाराने या मालिकेत सहभागी होणार आहोत.’
न्यूझीलंड दौºयापूर्वी आॅस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिका विजय महत्त्वाचा असल्याचे सांगत कोहली म्हणाला, ‘आम्ही सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर चर्चा केली की हा मालिकेतील अखेरचा सामना आहे. यात विजय मिळवला तर सकारात्मक मानसिकतेने दौºयावर जाता येईल. जर पराभूत झालो तर हा केवळ एक पराभव होता, असा विचार करीत विसरता येईल. पण जर विजय मिळवला आणि दडपणाखाली विजय साकारला तर त्यामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत होते आणि आम्ही उंचावलेल्या मनोधैर्यासह न्यूझीलंड दौºयावर जात आहोत.’
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने भारतीय कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालिक महान खेळाडू म्हटले आहे. त्याचवेळी, रोहित शर्माला अव्वल पाचमध्ये स्थान दिले आहे. रोहितने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसºया एक्दैवसीय सामन्यात ११९ धावा केल्या. हे त्याचे २९ वे एकदिवसीय शतक ठरले. कोहलीने ८९ चेंडूंत ९१ धावा केला. या दोघांनी १३७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने या लढतीत सहज विजय नोंदवला.
फिंच म्हणाला, ‘सलामीवीर शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे फलंदाजीसाठी उतरला नसताना दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने २८७ धावांचे लक्ष्य सहज गाठले. भारतीय संघात विराट आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालिक महान खेळाडू आहे आणि रोहित कदाचित सर्वकालिक फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल पाचमध्ये राहील. हे शानदार आहे. भारतीय संघाची विशेषता ही आहे की, त्यांचे अनुभवी खेळाडू मोठ्या सामन्यात आपली जबाबदारी सांभाळत आहेत. रोहितने शतक ठोकले. शिखर खेळणार नसल्याने त्यांना बदल करावा लागला आणि त्यांच्या दोन सर्वांत अनुभवी खेळाडूंनी सर्वाधिक योगदान दिले. त्यावरुन त्यांची आघाडीची फळी किती मजबूत आहे, याची कल्पना येते.’
Web Title: This time we will dominate New Zealand; Captain Virat Kohli says
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.