इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेकदा अम्पायरच्या निर्णयानंतर राडा झालेला पाहायला मिळालाय... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचा तर अनेकदा पारा चढलाय... इतकेच काय तर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी ही संतापलेला सर्वांनी पाहिला.. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात असे ३-४ निर्णय समोर येतातच त्याने वाद निर्माण होतोच. पण, आता ही गोष्ट टाळण्यासाठी आयपीएल २०२४ मध्ये Smart Replay System आणणार आहे. ज्याने निकाल जलद व अचूक लागण्यास मदत होणार आहे.
शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं
Smart Replay Systemचे हक्क टीव्ही अम्पायरकडे असतील आणि त्यांच्यासमोबत एकाच खोलीत हॉक-आय ऑपरेटर्स असतात. त्यांच्यासाठी अनेक टीव्ही स्क्रीन्स असतील जे वेगवेगळ्या अँगलच्या कॅमेरातून आलेले फुटेज दाखवतील आणि तेही जलद... ESPNcricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, स्मार्ट रिप्ले सिस्टीम अंतर्गत टीव्ही अम्पायर थेट दोन हॉक-आय ऑपरेटरकडून इनपुट प्राप्त करतील जे पंच म्हणून एकाच खोलीत बसतील आणि त्यांना हॉक-आयच्या आठ हाय-स्पीड कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या प्रतिमा दाखवतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हे आत्तापर्यंत थर्ड अम्पायर आणि हॉक-आय ऑपरेटर्स यांच्यातील दुवा होते, ते यापुढे नवीन प्रणाली अंतर्गत सहभागी होणार नाहीत.
स्मार्ट रिप्ले सिस्टीम टीव्ही अम्पायरला स्प्लिट-स्क्रीन प्रतिमांसह अधिक व्हिज्युअल्सचा संदर्भ देण्याची परवानगी देईल. सीमारेषेवरील पहिल्या क्षेत्ररक्षकाने हवेत घेतलेल्या रिले कॅचचे उदाहरणासह सांगता येईल, पूर्वी प्रसारक बॉल पकडल्याच्या अचूक क्षणी क्षेत्ररक्षकाच्या पाय आणि हातांची स्प्लिट स्क्रीन एकाच वेळी दाखवू शकत नव्हते. नवीन प्रणाली अंतर्गत, या दोन्ही फुटेजसह स्प्लिट स्क्रीन अम्पायरला जेव्हा चेंडू पकडला गेला किंवा सोडला गेला तेव्हा दाखवू शकतो.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वी The Hundred मध्ये अशाच सिस्टमची चाचणी केली आहे. BCCI ने निवडक पंचांसाठी रविवारी आणि सोमवारी मुंबईत नवीन प्रणालीवर दोन दिवसीय कार्यशाळा घेतली. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL 2024 मध्ये सुमारे १५ पंच आहेत.