Join us  

IND vs AUS : प्रशिक्षक राहुल द्रविडचं पद धोक्यात? माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य 

Ravi Shastri on Rahul Dravid's performance : महान फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघाला कोणतेही मोठे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:32 PM

Open in App

Ravi Shastri on Rahul Dravid's performance : महान फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघाला कोणतेही मोठे विजेतेपद जिंकता आलेले नाही. अशा परिस्थितीत त्याच्या प्रशिक्षकपदावर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि आशिया चषक खेळला, परंतु या दोन्ही स्पर्धा जिंकण्यात संघाला अपयश आले आहे. 

'स्पोर्ट्स तक'वर बोलताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी द्रविडबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. माझ्यासोबतही तेच झालं आणि द्रविडच्या बाबतीतही तेच घडतंय. त्याला वेळ देण्याची गरज आहे. तो सतत संघाशी जोडलेला असतो. संघातील खेळाडूंसोबत काम करतोय.  

आपल्या प्रशिक्षक पदाच्या काळातील आठवणी सांगताना शास्त्री म्हणाले की, आपल्या देशातील लोकांची स्मरणशक्ती कमकुवत आहे. मी प्रशिक्षक असताना भारताने दोनदा आशिया चषक जिंकला होता, पण हे कोणालाच आठवणार नाही. यावर कोणी बोलणार नाही. संघ आशिया कपमधून बाहेर पडताच. मग संघावर प्रश्न निर्माण होऊ लागतात. म्हणूनच मी म्हणतोय की प्रयत्न नेहमीच असायला हवेत.

२०२३ मध्ये टीम इंडियाला तीन ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. सर्व प्रथम, संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकण्याची संधी आहे. दुसरी संधी आहे ती सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप जिंकण्याची. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याची तिसरी संधी आहे. २०११मध्ये कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. अशा स्थितीत यंदा पुन्हा एकदा संघाला ही ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रवी शास्त्रीराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App