Join us  

IND vs BAN : बांगलादेशने टॉस जिंकला! भारताच्या हिताचा निर्णय घेतला; रोहितसेनेसमोर विजयी चौकार मारण्याचे आव्हान

ICC odi world cup 2023, IND vs BAN Live : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 1:37 PM

Open in App

IND vs BAN Live match updates in matathi | पुणे : आज वन डे विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत करून विजयी हॅटट्रिक मारल्यानंतर विजयाचा चौकार मारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. तर, बांगलादेशला विजयाचे खाते उघडता आले असले तरी इंग्लंड आणि न्यूझीलंड पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. आजच्या सामन्यासाठी बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि यजमानांना प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यामुळे सलग चौथ्या सामन्यात भारत आव्हानाचा पाठलाग करेल. खरं तर बांगलादेशने घेतलेला निर्णय भारताच्या हिताचा असल्याचे दिसते. कारण रोहितने शर्माने देखील आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती असे नाणेफेकीदरम्यान सांगितले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. 

भारतासमोर विजयी चौकार मारण्याचे आव्हान 

शेजाऱ्यांचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आज बांगलादेशचा पराभव करून विजयी चौकार लगावण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध बांगलादेशपुणेरोहित शर्मा