गुवाहाटी : भारतीय महिला संघ सोमवारपासून इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेद्वारे पुढील वर्षी या प्रकारात होणाऱ्या विश्वकप स्पर्धेसाठी खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करण्यास प्रयत्नशील आहे.भारतीय संघाने अलीकडेच ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती, पण टी-२० क्रिकेटमध्ये मात्र त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण न्यूझीलंड दौऱ्यात संघाला ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेत सफाया होण्यापूर्वी संघाने वन-डे मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. भारताने मुंबईत खेळल्या गेलेल्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेत इंग्लंडचा २-१ ने पराभव केला.टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर अद्याप दुखापतीतून सावरलेली नाही. तिच्या अनुपस्थितीत फॉर्मात असलेल्या सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करणार आहे. नेतृत्व कौशल्य सिद्ध करण्याची तिच्याकडे ही चांगली संधी आहे.हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत सिनिअर खेळाडू व वन-डे संघाची कर्णधार मिताली राजला तीन सामन्यांच्या या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. न्यूझीलंड दौºयातील पहिल्या दोन टी-२० सामन्यात मितालीला संघात स्थान देण्यात आले नव्हते आणि तिसºया लढतीत तिची २४ धावांची नाबाद खेळीही संघाला विजय मिळवून देण्यात अपुरीच ठरली. संघात पुनरागमन करीत असलेल्या वेदा कृष्णमूर्तीच्या कामगिरीवरही लक्ष राहील.>विजयी लय कायम राहील - हीथर नाईटगुवाहाटी : इंग्लंडची कर्णधार हीथर नाईट हिने सांगितले की, भारताविरोधात सोमवारी सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत अखेरच्या एकदिवसीय सामन्यातील विजयाने मिळवलेल्या आत्मविश्वासाने खेळ करू.नाईट हिने सांगितले की,‘पहिल्या दोन सामन्याच आम्ही चांगले खेळू शकलो नाही. आम्ही संथ सुरुवात केली. आणि अखेरच्या वनडेमध्ये विजय मिळवला. आशा आहे की संघाची लय बदलण्यात मदत मिळेल.’तिने सांगितले की, निश्चितपणे खेळाचे स्वरूप वेगळे आहे. खेळाडू खूपच उत्साहित आहेत. आम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. आम्ही चांगला खेळ करू.’>प्रतिस्पर्धी संघभारत : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झंझाड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल.इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया डंकले, फ्रेया डेव्हिस, जॉर्जिया एल्विस, एमी जोन्स, लौरा मार्श, नताली स्किवर, आन्या श्रेबसोल, लिंसे स्मिथ, लारेन विनफिल्ड, डॅनी वाट व अॅलेक्स हार्टले.‘प्रिया पुनिया व डी. हेमलता यांच्या स्थानी संघात समावेश करण्यात आलेल्या हरलीन देओल व भारती फुलमाळी या खेळाडूही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. मानसी जोशीच्या स्थानी डावखुरी वेगवान गोलंदाज कोमल झंझाड आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीचे नेतत्व शिखा पांडे करेल. संघात पाच स्पेशालिस्ट फिरकीपटूंना स्थान मिळाले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आज भारत-इंग्लंड लढत, यजमान संघाची नजर विश्वकप स्पर्धेच्या तयारीवर
आज भारत-इंग्लंड लढत, यजमान संघाची नजर विश्वकप स्पर्धेच्या तयारीवर
भारतीय महिला संघ सोमवारपासून इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेद्वारे पुढील वर्षी या प्रकारात होणाऱ्या विश्वकप स्पर्धेसाठी खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करण्यास प्रयत्नशील आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:30 AM