स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा आज वाढदिवस. रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी जामनगरमध्ये झाला.
२००८-०९ मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेण्यासाठी माधवराव शिंदे पुरस्काराचा मानकरी. २०१३ व २०१६ मध्ये आयसीसीने निवडलेल्या विश्व वन-डे इलेव्हनमध्ये स्थान.२०१६ मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत १० बळी. २०१७ मध्ये सर्वांत कमी सामन्यांत (३२ कसोटी) १५० बळींचा टप्पा गाठणारा डावखुरा फिरकीपटू. २०१८ मध्ये आयसीसीच्या अव्वल १० अष्टपैलूंमध्ये दुसऱ्या स्थानी. ५ ऑक्टोबर २०१८ ला कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक.मार्च २०१९ मध्ये वन-डेमध्ये २ हजार धावा व दीडशे बळी घेणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला.
लक्षवेधी कामगिरी : २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांत त्याने २५ बळी घेत दोन अर्धशतके झळकावली होती. त्या मालिकेत तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. २०१७ मध्ये तो आयसीसी कसोटी मानांकनात रविचंद्रन अश्विनसह अव्वल गोलंदाज ठरला होता.
कसोटी ४९, धावा १,८६९शतक १, अर्धशतक १४बळी २१३
वन-डे १६५, धावा २,२९६अर्धशतक १२, बळी १८७