लंडन : भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनविण्याच्या मार्गातील पहिले मोठे आव्हान आज, रविवारी आॅस्ट्रेलियाकडून मिळणार आहे. आयसीसी विश्वचषकाच्या या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्या डावपेचांची कठोर परीक्षा असेल.भारताने पहिल्या सामन्यातद. आफ्रिकेला सहा गड्यांनी सहज नमविले. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांत खेळात सुधारणा घडवून आणणाºया आॅस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध व्यावसायिकवृत्तीच्या बळावर विजय साजरे केले. पाचवेळेचा विजेता या संघाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्या निलंबनानंतर योग्यवेळी संघबांधणी केल्याचे दिसत आहे.
भारत अद्याप फलंदाजी-गोलंदाजीत योग्य संयोजनाच्या शोधात असून, द्विपक्षीय मालिकेत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याचा कटू अनुभव संघाच्या पाठीशी आहे. आॅस्ट्रेलियाचे फलंदाजी कोच रिकी पाँटिंगची भारतीय संघाच्या संयोजनावर नजर आहे. भारत एका फिरकी गोलंदाजासह खेळेल आणि केदार जाधवचा उपयोग दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून होईल, असे पाँटिंगला वाटते. कर्णधार औरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी केदारच्या फिरकीवर बºयाच धावा केल्या असल्यामुळे भारतीय कोच आणि कर्णधाराला अन्य पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.प्रतिस्पर्धी संघात स्मिथ आणि वॉर्नरचा समावेश असल्याचे पाहून भारत ओव्हलची खेळपट्टी आणि हवामान यांचा वेध घेत अंतिम एकादशमध्ये बदल करू शकतो. द. आफ्रिकेविरुद्ध बाहेर राहिलेल्या मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि शमीच्या वेगवान माºयाच्या बळावर आॅस्ट्रेलियावर दडपण आणण्याचे भारताचे प्रयत्न असतील.भारताने कुलदीप आणि चहल यांना संधी दिल्यास शमी संघात खेळेल आणि भुवनेश्वर कुमारला बाहेर बसावे लागेल. दोनपैकी एकच फिरकी गोलंदाज खेळल्यास चहलला बाहेर बसावे लागेल.केदार जाधव ओव्हलवर प्रभावी मारा करण्याची शक्यतादेखील कमीच आहे. येथे चेंडूला अधिक उसळी मिळते. फलंदाज त्यावर सहजपणे फटका मारू शकतो. अशावेळी अलगद मारा करण्यासाठी विजय शंकरचे नाव पुढे येऊ शकते.शिखर धवनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. तो येथे आल्यापासून धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. खेळपट्टीवर उसळी घेणारे चेंडू डावखुºया धवनसाठी डोकेदुखी ठरू शकतात. तो पुढील दोन्ही सामन्यांत अपयशी ठरल्यास लोकेश राहुलला सलामीला खेळवून चौथ्या स्थानावर विजय शंकरचा विचार होऊ शकतो. (वृत्तसंस्था)या दोन्ही संघांदरम्यान सन १९८० पासून आतापर्यंत १३६ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी आॅस्ट्रेलियाने ७७ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. भारताने ४९ सामने जिंकले असून, १० सामने निकालाविना संपले आहेत.या दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींमधील तीन सामने आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये भारत विजयी झाला आहे.या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९८३ पासून आतापर्यंत ११ सामने झाले असून त्यातील ८ सामन्यांमध्ये आॅस्ट्रेलियाने विजय मिळविलेला आहे. भारताला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत.आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. भारताने दोन वेळा हा मानमिळविलेला आहे.विश्वचषकामध्ये भारताने आॅस्ट्रेलियाच्या विरोधात २८९, तर आॅस्ट्रेलियाने भारताविरूद्ध ३५९ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.आॅस्ट्रेलियाची भारताविरोधात १२८ धावांची नीचांकी खेळी आहे, तर भारताची नीचांकी धावसंख्या १२५ आहे.भारत वि. आॅस्ट्रेलियासामने भारत आॅस्ट्रे.एकूण १३६ ४९ ७७विश्वचषक ११ ०३ ०८इंग्लंडमध्ये ३ १ २ओव्हलवर १ ० १शेवटचे पाच सामनेसंघ 1 2 3 ४ ५भारत विजय प. प. प. वि.आॅस्ट्रेलिया विजय वि. वि. वि. वि.सामना : दुपारी ३ वाजल्यापासूनइंग्लंडमधील सामने (विजयी)13 जून 1983 - आॅस्ट्रेलिया 162 धावा20 जून 1983 - भारत 118 धावा04 जून 1999 - आॅस्ट्रेलिया 77 धावाउभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा.आॅस्ट्रेलिया : अॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स केरी, अॅडम झम्पा, पॅट कमिन्स, नाथन कूल्टर-नाईल, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, शॉन मार्श, जेसन बेहरेनडोर्फ आणि केन रिचर्डसन.