राजकोट: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच टी२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने शनिवारी भारतीय संघ खेळणार आहे. विजय मिळाल्यास टीम इंडियाचा पाच वर्षांत हा तिसरा मालिका विजय ठरणार आहे. दुसरीकडे पाहुणा संघ देखील मुसंडी मारण्याच्या इराद्याने उतरणार असल्याने विराट सेनेपुढे कडवे आव्हान असेल.भारताने दिल्लीत झालेला पहिला सामना ५३ धावांनी जिंकला. सौराष्टÑ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची यजमान संघाला संधी राहील. आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती. डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कुमार तसेच जसप्रीत बुमराह यांनी दमदार गोलंदाजी केली तर फिरकीपटूंनी मधल्या षटकांत धावा रोखल्या. भारतााच्या अष्टपैलू कामगिरीमुळे केन विलियम्सनच्या न्यूझीलंड संघाला मालिका वाचविण्यासाठी धडपडावे लागत आहे. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना ७ नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रम येथे खेळविला जाईल.न्यूझीलंडला दुसºया सामन्यापासून पुनरागमन करायचे झाल्यास धवन, रोहित आणि कोहली यांच्या फलंदाजीस आवर घालावा लागेल. धवन- रोहितने १६ षटके खेळून दिल्लीत १५८ धावांची विक्रमी सलामी दिली होती. याजोरावर भारताने २०० धावा उभारल्या. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांना नव्या चेंडृूने प्रभावी मारा करता आला नव्हता. पाहुण्या क्षेत्ररक्षकांनी अनेक झेल सोडले तर भारताने प्रभावी क्षेत्ररक्षण केले होते. युवा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने कर्णधार विलियम्सन आणि रॉस टेलर यांना त्रस्त केले. केवळ टॉम लॅथम चहलचे चेंडू प्रभावीपणे खेळू शकला.दरम्यान राजकोटच्या मैदानावर होणारा हा दुसरा टी-२० सामना आहे. आयपीएलच्या गुजरात लायन्सचे हे गृहमैदान असून आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये भारताने विजय मिळविला होता. २०१३ आणि २०१५ साली येथे दोन वन डेचे आयोजन झाले. इंग्लंड आणि द. आफ्रिकेविरुद्ध भारत पराभूत झाला. कसोटीचा दर्जा मिळताच भारत- इंग्लंड यांच्यात येथे पहिली कसोटी खेळविण्यात आली होती. (वृत्तसंस्था)संभाव्य संघ :भारत : विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर , दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, लोकेश राहुल.न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), टॉड एसेल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कोलिन डे ग्रॅण्डहोमे, मार्टिन गुप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, ईश सोढी, टिम साऊदी....तर निश्चितच पुढच्या लढतीत खेळणार - अक्षर पटेलमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाच्या स्थानी बदली खेळाडू असल्याचे मानत नसून जर चांगली कामगिरी केली तर निश्चितच पुढच्या लढतीसाठी संघात निवड होईल, अशी प्रतिक्रिया भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने व्यक्त केली.व्यावसायिक क्रिकेटपटू जडेजाऐवजी अक्षरची संघात निवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यापासून तो ८ वन-डे सामने खेळला असून १० बळी घेतले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने किफायती गोलंदाजी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अक्षर म्हणाला,‘मला संघात स्थान देण्यात आल्यामुळे मी खेळत आहे. जर मी एका सामन्यात चांगली कामगिरी केली तर पुढील लढतीत निश्चितच संधी मिळते, असे माझे मत आहे.’न्यूझीलंडविरुद्ध मुंबईमध्ये पहिला वन-डे सामना गमाविल्यानंतर (त्यात लॅथमने कुलदीप यादवविरुद्ध सातत्याने स्वीपच्या फटक्याचा वापर केला) भारतीय संघाने रणनीतीमध्ये बदल करताना अक्षरला संधी दिली आणि ती उपयुक्त ठरली.भारताची लय मोडावी लागेल - सोढीभारताविरोधातील टी २० सिरीजमध्ये पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाची लय मंद करावी लागेल, असे मत न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढी याने व्यक्त केले.न्यूझीलंडला भारताविरोधात पहिल्या टी२० सामन्यात ५३ धावांनी पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत कायम राहण्यासाठी उद्या एमसीए स्टेडियममध्ये होणारा दुसरा सामना जिंकावा लागेल. सोढी याने सांगितले की,‘मला वाटते की आम्ही मुंबईत शानदार खेळ केला. दुसºया वनडेत आम्हाला संघर्ष करावा लागला.आम्ही येथे आलेल्या इतर संघांपेक्षा फिरकीला चांगले तोंड दिले आहे.’ तो म्हणाला,‘ टी२० क्रिकेटमध्ये लय खूप महत्त्वाची असले. मला वाटते कीस भारताने सुरुवातीला चांगली भागीदारी केली होती. त्यामुळे सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी विक्रमी १५८ धावांची भागीदारी केली. यामुळे सामन्याची लय बनली. मला वाटते की, त्यांची लय आम्ही कशी मंद करतो, हे महत्त्वाचे ठरते.स्थळसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमैदान, राजकोटवेळसायं. ७ पासून
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आज दुसरा टी-२० सामना : ऐतिहासिक मालिका विजयाचा निर्धार, पाहुण्या न्यूझीलंडला नमविण्यास भारत पुन्हा सज्ज
आज दुसरा टी-२० सामना : ऐतिहासिक मालिका विजयाचा निर्धार, पाहुण्या न्यूझीलंडला नमविण्यास भारत पुन्हा सज्ज
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच टी२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने शनिवारी भारतीय संघ खेळणार आहे. विजय मिळाल्यास टीम इंडियाचा पाच वर्षांत हा तिसरा मालिका विजय ठरणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:19 AM