पल्लिकल : यजमान श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ आज रविवारी तिस-या वन-डेत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दुसरीकडे, लंकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. विराट अँड कंपनीने पहिले दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली. पुढील सामना जिंकल्यास ३-० अशी विजयी आघाडी होईल. अखेरचे दोन्ही सामने कोलंबोत खेळले जातील.
दुसºया वन-डेत १३१ धावांत ७ फलंदाज बाद झाल्यानंतरही भारताने शानदार विजय नोंदविला. याआधी भारतीय संघ २००२ मध्ये या मैदानावर खेळला होता. संघाच्या डावपेचांत कोहली कुठले बदल करतो, हे पाहावे लागेल. दुसºया वन-डेआधी कोहलीने युवा चेहºयांना संधी देणार, असे म्हटले होते. त्यानुसार अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल कायम राहतील का, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसºया वन-डेत फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल झाले होते. लोकेश राहुल तिसºया आणि केदार जाधव चौथ्या स्थानावर आले होते. कोहलीचे हे डावपेच फसले होते. पुन्हा असे करावे, की जुन्याच क्रमवारीनुसार फलंदाजांना पाठवावे, अशा द्विधा मन:स्थितीत कर्णधार आहे.
दुसरीकडे, मागच्या सामन्यातील भारताच्या घसरगुंडीमुळे लंकेच्याही मालिकेत पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण त्यासाठी नाणेफेकीचा कौल मोलाचा ठरेल. कोहलीने दौºयात सलग पाचव्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांच्या शतकी भागीदारीमुळेही मधल्या फळीत प्रयोग करता आले. येथे नाणेफेक जिंकताच डावपेचांत बदल करणे कोहलीला भाग पडू शकते. अंतिम एकादशमध्ये हार्दिक पांड्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहे.
दुसºया वन-डेदरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसली. संघव्यवस्थापनाने मात्र दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट केले. हार्दिक न खेळल्यास कुलदीप यादव किंवा शार्दूल ठाकूर यांपैकी एकाला पाचवा गोलंदाज म्हणून संधी दिली जाईल.
लंका संघात बदल अपेक्षित आहेत. उपुल थरंगा दोन सामन्यांसाठी निलंबित झाला असल्याने आक्रमक दिनेश चंडीमल हा चौथ्या स्थानावर फलंदाजीला येईल. चामरा कापुगेदरा हा संघाचे नेतृत्व करणार असून, निरोशन डिकवेला-लाहिरू थिरीमन्ने ही जोडी सलामीला येईल. धनुष्का गुणतिलका याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. (वृत्तसंस्था)
वन-डेत प्रयोग सुरू राहतील : श्रीधर
लंकेविरुद्ध दुसºया वन-डेदरम्यान मधली फळी ढेपाळल्यानंतरही उर्वरित सामन्यात प्रयोग सुरूच राहणार असल्याचे संकेत क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘पुढील १८ महिन्यांत काही बदल करायचे असल्याने आम्हाला तिन्ही सामने जिंकण्यासाठी विविध स्तरांवर प्रयोग करायचे आहेत. प्रत्येक फलंदाजाला संधी मिळावी, यासाठी क्रम बदलणे सुरूच राहील. लोकेश राहुलला याच पद्धतीने खेळविण्यात आले होते. फिटनेसमध्ये सर्वोत्कृष्ट असलेला भारतीय संघ क्षेत्ररक्षणातही अव्वल दर्जाचा बनू इच्छितो. जे खेळाडू सातत्याने सराव करतात, त्यांना कठोर सराव न देता जे सामन्याबाहेर राहतील, त्यांच्या सरावावर अधिक भर देण्याचे धोरण राबवित आहोत.’’
भारताविरुद्ध जिंकू
शकतो : कापुगेदरा
दुसºया वन-डेत पराभव झाला, तरी सहकाºयांच्या झुंजार वृत्तीवर विश्वास असल्याने भारताविरुद्ध जिंकू शकतो, असा विश्वास वाटत असल्याचे लंकेचा काळजीवाहू कर्णधार चामरा कापुगेदरा याने म्हटले आहे. संघाचे मनोधैर्य ढासळल्याचे वृत्त फेटाळताना चामरा म्हणाला, ‘‘लंकेला मालिकेत पहिल्यांदा सूर गवसला. दुसºया वन-डेत भारताला पराभूत करण्याच्या स्थितीत होतो. विजय मिळाला नसला तरी आत्मविश्वासात आणि एकजुटीत भर पडल्याने जिंकू शकतो, याची खात्री पटली.’’ धोनीच्या अनुभवाच्या बळावर भारताने सामना खेचून नेला, तरी अकिला धनंजयाच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे चामराने सांगितले.
सामना : दुपारी २.३० पासून स्थळ : पल्लीकल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
Web Title: Today's third ODI: India will aim to win series, play for Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.