ठळक मुद्देरविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघानं भारताचा पराभव केला.
ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनी ही नव्हतं. शाहिन शाह आफ्रिदीनं (Shaheen Shah Afridi) दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरलं. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणं, सोपं नव्हतं. मात्र, त्यांन एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने व्हिडीओ शेअर करत हरभजन सिंगला टोला लगावला.
"हरभजन सिंग वॉकओव्हर हवाय. नको, चला काय करु शकतो आपण. आता सहन करा," असं शोएब त्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. यानंतर हरभजननही यावर पलटवार केला. "ठीक आहे, तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा. मी इकडेच आहे शोएब भाई. लवकरच क्रिकेटबाबत आपली पुन्हा एकदा चर्चा होईल," असं हरभजन म्हणाला.
१५२ धावांचं आव्हानशाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या.
बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बाबर व रिझवान ही जोडी सातत्यानं चांगली कामगिरी करत होती आणि त्यांना लवकर बाद करणे भारतीय गोलंदाजांना जमलं नाही.
Web Title: Tolerate this Shoaib Akhtar responds to Harbhajans walkover remark after Pakistan beat India in T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.