लंडन : मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्या जोडीपैकी एक प्रसिद्ध गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) पद्धत देणाºया समितीचे ते सदस्य होते. १९९२ साली सिडनी येथे झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर डीएलएस सूत्र तयार करण्यात आले.
टोनी यांनी सहकारी गणिततज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. ाुईस क्रिकेटपटू नव्हते, मात्र क्रिकेट आणि गणितात दिलेल्या योगदानाबद्दल २०१० मध्ये त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा विशेष सन्मान ‘एमबीई’ देऊन गाौरविण्यात आले होते.
आयसीसीने १९९९ मध्ये अधिकृतपणे हा नियम स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न सूत्रानुसार या नियमाचे नाव बदलण्यात आले. (वृत्तसंस्था)
आयसीसीने वाहिली श्रद्धांजली
च्आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी टोनी लुईस यांना श्रद्धांजली वाहिली. आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस यांनी सांगितले की, ‘क्रिकेटमध्ये टोनीचे खूप मोठे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुधारीत लक्ष्य निर्धारीत करण्याची प्रणाली दोन दशकांहून अधिक काळापूर्वी त्यांनी आणि फ्रँक डकवर्थ यांनी तयार केली होती. येणाºया अनेक वर्षामध्येही त्यांचे योगदान नेहमीच आठवले जाईल.’