नवी दिल्ली : भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या सुधारित वेतन करारावर मार्च महिन्यामध्ये स्वाक्षरी झालेली असतानाही अद्याप खेळाडूंना या नव्या करारानुसार वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शुक्रवारी येथे होणाऱ्या प्रशासकांच्या समिती (सीओए) विरोधाच्या बीसीसीआयच्या विशेष साधारण सभेत हा विषय चर्चेचा मुख्य विषय असेल. भारतीय संघ २३ जूनला ब्रिटन दौºयावर जाणार असून या दौºयात इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध सामने खेळविण्यात येतील. सुमारे तीन महिन्यांचा मोठा हा प्रदीर्घ दौरा असेल. शुक्रवारी होणाºया बैठकीदरम्यान बीसीसीआय अधिकारी दहा मुद्यांवर चर्चा होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, ‘होय, करार माझ्याजवळ आहेत. जर शुक्रवारी बैठकीत या सुधारीत वेतन कराराला मंजूरी मिळाली, तर मी यावर स्वाक्षरी करेन. पण जर का मंजूरी नाही मिळाली, तर माझे हात बांधलेले असतील. कोणत्याही निर्णयाला साधारण सभेची मंजूरी मिळण्याची आवश्यकता असते आणि मी नियम मोडू शकत नाही.’ त्याचवेळी, प्रशासकीय समितीने याआधीच स्पष्ट केले आहे की, ते अशा बैठकीला मंजूरी देत नाही. त्यांनी वेतन घेणाºया अधिकाºयांना या बैठकीपासून दूर राहण्याचेही सांगितले होते. मात्र, समिती प्रमुख विनोद राय यांना खेळाडूंना वेतन मिळण्यात होणाºया दिरंगाईचीही चिंता आहे.या विषयी राय म्हणाल, ‘वैयक्तिकरीत्या मला चांगले वाटत नाही, की खेळाडूंना वेळेवर वेतन मिळत नाही. मला काहीच कल्पना नाही की, सधारण सभेत काय निर्णय होईल. खेळाडूंच्या स्वाक्षरीनंतर या कराराची एक प्रत सचिवांना पाठविण्यात आली होती.’ सुधारीत वेतन करारानुसार ‘ए प्लस’ गटातील खेळाडूंना सार करोड रुपये, ‘ए’ गटातील खेळाडूंना पाच करोड रुपये, ‘बी’ आणि ‘सी’ गट खेळाडूंना अनुक्रमे तीन करोड आणि एक करोड रुपये दिले जाणारआहेत. (वृत्तसंस्था)>बैठकीदरम्यान आयसीसीशी निगडीत मुद्यांवरही चर्चा होईल अशी माहिती मिळाली. वादग्रस्त सदस्य भागीदारी करार (एमपीए) अंतर्गत भारतात २०२१ मध्ये होणाºया चॅम्पियन्स ट्रॉफीएवजी टी२० विश्वचषक खेळविण्यात येणार असलयाच्या निर्णयावर चर्चा होईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आघाडीच्या क्रिकेटपटूंना अद्याप नव्या करारानुसार वेतन मिळाले नाही
आघाडीच्या क्रिकेटपटूंना अद्याप नव्या करारानुसार वेतन मिळाले नाही
भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या सुधारित वेतन करारावर मार्च महिन्यामध्ये स्वाक्षरी झालेली असतानाही अद्याप खेळाडूंना या नव्या करारानुसार वेतन मिळालेले नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:57 AM