इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा २००८ च्या पहिल्या हंगामापासून सर्वोत्तम क्रिकेटची अनुभूती देणारी लीग म्हणून लोकप्रिय ठरली आहे. इथं प्रत्येक हंगामातील प्रत्येक सामन्यात एखादा विक्रम प्रस्थापित होतो. या स्पर्धेत काही फलंदाजांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीसह निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचेही पाहायला मिळाले आहे. इथं एक नजर टाकूया, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांवर... zuplay.com ने खास आयपीएलप्रेमींसाठी ही सविस्तर माहिती संकलित केलीय.
१. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ८,०६३ धावा
क्रिकेट जगातील सुपरस्टार विराट कोहली आयपीएलमध्येही किंग आहे. तो २५३ सामन्यांत ८,०६३ धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. २००८ च्या पहिल्या हंगामापासून कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा भाग आहे. आरसीबी म्हणजे कोहली असे समीकरणच या स्पर्धेत पाहायला मिळते. कोहली फलंदाजीतील कमालीची सरासरी आणि स्ट्राइक रेटसह सातत्याने संघासाठी बहूमुल्य योगदान देत आपल्यातील अविश्वसनीय क्षमता दाखवून दिल आहे. २०१६ चा हंगाम कोहलीसाठी एकदम खास होता. या हंगामात त्याने ४ शतकांसह ९७३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Virat Kohli | 2008-2025 | 253 | 8063 | 38.95 | 113* |
२. शिखर धवन (पंजाब किंग्ज) - ६,७६९ धावा
आपल्या सुरेख फटकेबाजीने क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या शिखर धवनने आयपीएलमध्ये खास छाप सोडली आहे. २२२ सामन्यांत त्याने ६,७६९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसह अन्य फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधीत्व करताना सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवताना त्याने २ शतके आणि ५१ अर्धशतके झळकावल्याचेही पाहायला मिळाले. उत्तम सलामीवीराच्या रुपात त्याने ही स्पर्धा गाजवली आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Shikhar Dhawan | 2008-2024 | 222 | 6769 | 35.25 | 106* |
३. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) - ६,६२८ धावा
मुंबई इंडियन्सच्या संघाला सर्वाधिक ५ वेळा चॅम्पियन करणारा कर्णधार अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने २५८ सामन्यांमध्ये ६,६२८ धावा केल्या आहेत. डेक्कन चार्जर्ससह आयपीएल प्रवास सुरू करणारा रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसते. रोहितने आयपीएलमध्ये २ शतके आणि ४३ अर्धशतके झळकावली आहेत. नेतृत्वाच्या कर्तृत्वानंतर तो आता फलंदाजाच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Rohit Sharma | 2008-2025 | 258 | 6628 | 29.58 | 109* |
४. डेविड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स) - ६,५६५ धावा
ऑस्ट्रेलियन स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर याने आयपीएलमधील १८४ सामन्यांमध्ये ६,५६५ धावा केल्या आहेत. वॉर्नरच्या खात्यात ४ शतके आणि ६२ अर्धशतकांची नोंद आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखणारा ऑस्ट्रेलियन स्टार सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसला आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
David Warner | 2009-2024 | 184 | 6565 | 40.52 | 126 |
५. सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्ज) - ५,५२८ धावा
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना, हा चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीतील प्रमुख खेळाडू होता. त्याने २०५ सामन्यांमध्ये ५,५२८ धावा केल्या आहेत. आयपीएल कारकिर्दीत त्याच्या नावे एका शतकासह ३९ अर्धशतकांची नोंद आहे. नाबाद १०० धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे. मधल्या फळीतील चेन्नईचा हुकमी एक्का ठरलेल्या रैनानं २०२२ च्या हंगामाआधी त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Suresh Raina | 2008-2021 | 205 | 5528 | 32.51 | 100 |
६. एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) - ५,२४३ धावा
चेन्नई सुपर किंग्जचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीने २६४ सामन्यांमध्ये ५,२४३ धावा केल्या आहेत. तो फिनिशिंग खेळीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये त्याच्या खात्यात एकही शतक नसले तरी २४ अर्धशतकांसह त्याने या स्पर्धेत आपली खास छाप सोडली आहे. नाबाद ८४* ही त्याची आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
MS Dhoni | 2008-2025 | 265 | 5243 | 39.12 | 84* |
७. एबी डिव्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ५,१६२ धावा
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज होता. त्याने आयपीएल कारकिर्दीत ३ शतके आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत. मिस्टर ३६० डिग्री फटकेबाजीच्या जोरावर तो आपल्या कारकिर्दीत अनेक गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
AB de Villiers | 2008-2021 | 184 | 5162 | 39.70 | 133* |
८. क्रिस गेल (वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधीत्व) - ४,९६५ धावा
युनिव्हर्स बॉस नावाने ओळखला जाणारा क्रिस गेल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक होता. १४२ सामन्यांत त्याने ३९.७२ च्या सरासरीसह १४८.९६ च्या स्ट्राइक रेटनं ४,९६५ धावा केल्या आहेत. नाबाद १७५ या विक्रमी खेळीसह त्याच्या खात्यात ६ शतके आणि ३१ अर्धशतकांची नोंद आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Chris Gayle | 2009-2021 | 142 | 4965 | 39.72 | 175* |
९. रॉबिन उथप्पा (वेगवेगळ्या फ्रँयाचायझी संघाचे प्रतिनिधीत्व) - ४,९५२ धावा
रॉबिन उथप्पा विविध फ्रँचायझींमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. २०५ सामन्यांत २७.५१ ची सरासरी आणि १३०.३५ च्या स्ट्राइक रेटसह त्यानं ४,९५२ धावा केल्या आहेत. उथप्पाची सर्वोच्च धावसंख्या ८८ असून त्याच्या खात्यात आयपीएलमध्ये २७ अर्धशतकांची नोंद आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Robin Uthappa | 2008-2022 | 205 | 4952 | 27.51 | 88 |
१०. दिनेश कार्तिक (एकाधिक संघ) - ४,८४२ धावा
दिनेश कार्तिक एक अनुभवी विकेटकीपर-बॅटर होता अनेक आयपीएल फ्रँचायझींचे त्याने प्रतिनिधीत्व केले. २६.११ ची सरासरी आणि १३२.९८ चा स्ट्राइक रेटसह त्याने ४,८४२ धावा केल्या आहेत. त्याच्याही खात्यात एकही शतक नाही. पण अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजीसह सामना फिरवण्याची क्षमता त्याने दाखवून दिली. नाबाद ९७ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
Player | Span | Matches | Runs | Average | HS |
Dinesh Karthik | 2009-2024 | 242 | 4842 | 26.11 | 97* |
निष्कर्ष/सारांश
आयपीएलमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरीसह वर्चस्व गाजवले आहे. यात विराट कोहली सर्वात आघाडीवर आहे. शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर खेळाडूंनीही आयपीएल स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल स्पर्धेच्या आगामी हंगामात नवे तारे चमकतील अन् नवे विक्रम पाहायला मिळतील. याच रंजकतेमुळे या स्पर्धेची जगभरातील उत्सुकता कायम राहिल्याचे पाहायला मिळेल.
अधिक माहितीसाठी लॉग-इन करा: zuplay.com
Web Title: Top Run Scorers in IPL History: List of All Time Leading Run-Getters
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.