Join us  

Asia Cup 2022 : तोते उड जाते! श्रीलंकेच्या विजयानंतर Virender Sehwag चा Out Of The Box सल्ला

Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan : दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने आशिया चषक २०२२च्या फायनलमध्ये पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवून जेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 2:40 PM

Open in App

Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan : दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने आशिया चषक २०२२च्या फायनलमध्ये पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवून जेतेपद पटकावले. २०१४नंतर हे त्यांचे पहिलेच आशिया चषक जेतेपद ठरले, तर त्यांनी एकूण सहाव्यांदा हा चषक उंचावला आहे. ५ बाद ५८ अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या श्रीलंकेला भानुका राजपक्षाने सावरले. त्याच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर प्रमोद मदुशानने चार आणि वनिंदू हसरंगाने तीन विकेट्स घेत पाकिस्तानचा संघ १४७ धावांत तंबूत पाठवला. हसरंगाने १७व्या षटकात मोहम्मद रिझवानसह तीन विकेट्स घेत सामना फिरवला.

Asia Cup Final SL vs PAK prize money : आशिया चषकासह श्रीलंकेला १.१९ कोटी; उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली माहित्येय?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचा संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही आणि त्यांना मुख्य स्पर्धेत एन्ट्री मिळवण्यासाठी पात्रता स्पर्धा खेळावी लागणार आहे. अशात भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने एक अजब सल्ला दिला आहे. जो संघ वर्ल्ड कप साठी पात्रही ठरलेला नाही, अशा संघाकडून पराभूत होणारा संघही वर्ल्ड कप साठी अपात्र ठरवला जावा, असा  Out Of The Box सल्ला वीरूने दिला.  

त्याने ट्विट केले की,''श्रीलंकेच्या संघाने उत्तम खेळ केला आणि आशिया चषक त्यांचाच आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही त्यांनी निश्चित केलेली नाही. अशा  संघाकडून हरणाऱ्या संघालाही अपात्र ठरवले गेले, तर किती मजेशीर होईल. तोते उड जाते सब टीम के.'' आशिया चषक स्पर्धेचा इतिहास१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. सहा जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

 

टॅग्स :एशिया कप 2022विरेंद्र सेहवागश्रीलंकापाकिस्तान
Open in App