मेलबोर्न : भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौºयाबाबत असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए)गुरुवारी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौºयाची घोषणा करीत ऑक्टोबरमध्ये सुरू होणाºया या दौºयात चार कसोटी सामन्यांशिवाय प्रत्येकी ३ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील, यावर शिक्कामोर्तब केले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने पार पडल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. तथापि कोरोनामुळे हे आयोजन होण्याची शक्यता कमीच आहे. सीएनेदेखील गुरुवारी जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकात विश्वचषकाचा उल्लेख केलेला नाही. यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. ३ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत यजमान संघाविरुद्ध चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील.
‘वृत्तानुसार भारताच्या दौºयामुळे सीएला ३० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरची कमाई होईल. भारतीय महिला संघदेखील तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौरा करेल. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत हे तीन सामने खेळविले जातील. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकेल याची जाणीव असल्याने आज जाहीर केलेल्या वेळापत्रकात थोडा बदल शक्य आहे. मात्र उन्हाळ्यात आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाची भरपाई करण्याचा आमचा निर्धार कायम आहे. गरजेनुसार वेळापत्रकात बदलाची तयारी असेल,’ असे सीएचे सीईओ केविन रॉबर्ट्स यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
महिला वन डे मालिका
२२ जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना, कॅनबेरा२५ जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना, मेलबोर्न२८ जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना, होबार्ट
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
११ आॅक्टोबर : पहिला टी-२० सामना, ब्रिस्बेन१४ आॅक्टोबर : दुसरा टी-२० सामना, कॅनबेरा१७ आॅक्टोबर : तिसरा टी-२० सामना, अॅडिलेड३ डिसेंबरपासून : पहिली कसोटी, ब्रिस्बेन११ डिसेंबरपासून : दुसरी कसोटी, अॅडिलेड (डे नाईट)२६ डिसेंबरपासून : तिसरी कसोटी, मेलबोर्न३ जानेवारीपासून : चौथी कसोटी, सिडनी१२ जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना, पर्थ१५ जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना, मेलबोर्न१७ जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी