बँकॉक : ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाने क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला. थायलंडमधील कोह सामुई येथील व्हिलामध्ये वयाच्या ५२व्या वर्षी वॉर्नचे जगाचा निरोप घेतला. मात्र त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या व्हिलामधील वॉर्नच्या खोलीची तपासणी केली असता त्यांना टॉवेल आणि जमिनीवर रक्ताचे डाग दिसले आहेत.
रविवारी ऑस्ट्रेलियातील एका संकेतस्थळाने थायलंड येथील माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले. याबाबत बोलताना थायलंड येथील स्थानिक पोलीस अधिकारी सतित पोलपिनीत म्हणाले की, ‘निधन होण्यापूर्वी वॉर्नच्या छातीत दुखत असल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यावेळी त्याला सीपीआर देण्यात येत असताना रक्तस्त्राव झाला. शिवाय त्यावेळी तो खोकतही होता.’ तर कोह कुनई येथील पोलीस युत्ताना सिरीसोम्बाट यांनी सांगितले की, ‘वॉर्नला अस्तमा व हृदयासंबंधित विकाराचा त्रास आधीपासूनच होता. मात्र वॉर्नने कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सचे सेवन केलेले नव्हते. रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या बिछान्यावर रक्ताचे डाग झाले असावेत.’
तीन महिन्यांच्या सुट्टीवर होता वॉन
शेन वॉर्नच्या पार्थिवाला कोह समुई बेटावरून थायलंडला आणण्यात आले आहे. यादरम्यान शनिवारी वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एर्सकिने यांनी सांगितले की, ‘शेन वॉर्न हा तीन महिन्यांची सुटी घालवण्यासाठी एकटाच येथे आला होता. इथे येऊन त्याला तीनच दिवस झाले होते.’ विशेष म्हणजे आधी सांगण्यात आले होते की तो आपल्या मित्रांसमवेत येथे आला आहे. त्याला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो क्रिकेट पाहत असल्याचे म्हटले गेले. स्थानिक पोलिसांना सुरुवातीच्या चौकशीनंतर सध्यातरी कुठल्याही घातपाताची शक्यता वाटत नाही आहे. तरीसुद्धा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. तसेच वॉर्नच्या परिवाराने लवकरात लवकर त्याचे पार्थिव मिळण्याबाबत विनंती केली आहे.
Web Title: Towels in shane Warne's room and blood stains on the ground; Thai police information
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.