Join us  

रेल्वे ‘सुपरफास्ट’! रणजी करंडक : बलाढ्य मुंबईवर दहा गड्यांनी मात

यजमान विदर्भाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांना चोख उत्तर देणाºया पंजाबने जामठा स्टेडियमवर अ गटाच्या रणजी करंडक लढतीत तिसºया दिवसअखेर बिनबाद १३२ अशी दमदार वाटचाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 3:29 AM

Open in App

मुंबई : रेल्वेने शुक्रवारी येथे एलीट ‘ब’ गटातील सामन्यात तीन दिवसांच्या आत मुंबईवर १० गडी राखून मात करीत या रणजी हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात खळबळजनक निकालाची नोंद केली. मुंबईचा पहिला डाव ११४ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार कर्ण शर्मा याच्या नाबाद ११२ धावांच्या बळावर रेल्वेने पहिल्या डावात १५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर हिमांशू सांगवान याने ६० धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर रेल्वेने मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांत गुंडाळला.अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात अपयशी ठरला.

४१ वेळेसचा रणजी चॅम्पियन मुंबईने तिसºया दिवशी ३ बाद ६४ या धावसंख्येवरून सुरुवात केली. परंतु रहाणे कालच्या ३ धावांत आज फक्त ५ धावांची भर घालू शकला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९४ चेंडूंत ६५ धावा) आणि अनुभवी आदित्य तारे (१४ धावा) यांनी ६४ धावांची भागीदारी करीत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या डावात ६ गडी बाद करणारा रेल्वेचा गोलंदाज प्रदीप टी. याने तारे याला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर रेल्वेने सूर्य आणि शम्स मुलानी (१) यांना सलग बाद केले. तथापि, शार्दुल ठाकूर (२१ धावा) आणि आकाश पारकर (नाबाद ३५) यांनी झुंजार फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईचा डावाने पराभव टळला. उपहारानंतर ठाकूरदेखील बाद झाला. त्यामुळे मुंबईची ८ बाद १६४ अशी स्थिती झाली आणि ते १२ धावांनी पुढे होते.वेगवान गोलंदाज तुषार पांडे १५ चेंडूंनंतर बाद झाला. पारकरच्या खेळीने मुंबईने रेल्वेला विजयासाठी ४७ धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंह (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून दिला.पंजाबचे विदर्भाला चोख उत्तरनागपूर : यजमान विदर्भाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांना चोख उत्तर देणाºया पंजाबने जामठा स्टेडियमवर अ गटाच्या रणजी करंडक लढतीत तिसºया दिवसअखेर बिनबाद १३२ अशी दमदार वाटचाल केली. अनिर्णीत अवस्थेकडे वाटचाल करणाºया या लढतीत पंजाबला विदर्भावर पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची मोठी संधी चालून आली आहे. पाहुणा संघ विदर्भाच्या तुलनेत अद्याप २०६ धावांनी मागे असून दहा फलंदाज शिल्लक आहेत. आज शनिवार सामन्याचा अखेरचा दिवस असेल. त्याआधी, विदर्भाने बुधवारी पंजाबविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६ गड्यांच्या मोबदल्यात १९६ अशी मजल गाठली होती. त्यावेळी गणेश ८८ आणि आदित्य सरवटे ९ धावांवर नाबाद होते. काल दुसºया दिवसाच्या खेळाला खराब हवामानाचा फटका बसला. आज गणेश सतीश याने सर्वाधिक १४५ धावा ठोकल्या. ३०१ चेंडूंचा सामना करणाºया गणेशने १७ चौकार आणि एक षटकारासह १४ वे प्रथमश्रेणी शतक साजरे केले. १०८ व्या षटकात तो धावबाद झाला. आदित्य सरवटे याने ४८ आणि अक्षय वखरे याने ३४ धावा केल्या. तळाचा फलंदाज रजनीश गुरबानी याने नाबाद २७ धावांचे योगदान दिले. विदर्भाचा डाव ११८.२ षटकांत ३३८ धावांत आटोपला. 

 

टॅग्स :रेल्वेरणजी करंडकनागपूर