India vs Pakistan लढतीपूर्वी विराट कोहलीच्या व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीची कमेंट, म्हणाला...

पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून भारतीय संघाला यंदा पराभूत करू असे दावे केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:24 PM2021-10-06T19:24:13+5:302021-10-06T19:24:34+5:30

whatsapp join usJoin us
‘Treat to watch’ – Shahid Afridi lauds Virat Kohli for his undivided attention in practice sessions | India vs Pakistan लढतीपूर्वी विराट कोहलीच्या व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीची कमेंट, म्हणाला...

India vs Pakistan लढतीपूर्वी विराट कोहलीच्या व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीची कमेंट, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) हे कट्टर प्रतिस्पर्धी आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्याच सामन्यांत एकमेकांना भिडणार आहे. त्यामुळे विराट कोहली विरुद्ध बाबर आजम ( Virat Kohli vs Babar Azam) यांच्यातली टशन पाहण्यासाठी दोन्ही देशांचे चाहते उत्सुक आहेत. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर उभय संघ आमनेसामने येत आहेत. या लढतीपूर्वी पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून भारतीय संघाला यंदा पराभूत करू असे दावे केले जात आहेत. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं ( Shahid Afridi) बुधवारी विराटच्या एका व्हिडीओवर कमेंट करून चर्चेला तोंड फोडले आहे. IPL 2021मधील सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्धच्या सामन्यासाठी नेट्समध्ये ( Virat Kohli’s dedication during a net session) सराव करतानाचा हा व्हिडीओ आहे. 

मंगळवारी विराटनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात विराट नेट्समध्ये कसून फलंदाजी करत आहे. विराटचे हे समर्पण पाहून आफ्रिदी थक्क झाला आणि त्यानं विराटचं कौतुक केलं. आयपीएल २०२१त विराटच्या संघानं प्ले ऑफमधील जागा पक्की केली आहे आणि हैदराबादविरुद्ध विजय मिळवून गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानांमध्ये जागा पक्के करण्याचा त्यांचा निर्धार आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतीय खेळाडूंचा आयपीएलच्या माध्यमातून चांगला सराव होत आहे.

२०१८साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आफ्रिदीनं विराटचं कौतुक केलं. त्यानं विराटचं ट्विट रिट्विट करताना लिहिलं की, समर्पण पाहून आनंद झाला, ग्रेट खेळाडू नेहमीच सरावातही १०० टक्के देतात.'' 


 

Web Title: ‘Treat to watch’ – Shahid Afridi lauds Virat Kohli for his undivided attention in practice sessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.