मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाबीसीसीआयने आपल्या वार्षिक करारामधून वगळले आणि त्याच्या चाहत्यांनी या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढला. सोशल मीडियावर सध्या #ThankYouDhoni हा ट्रेंड चांगलाच गाजत आहे. पण हा ट्विटरवर सुरु झालेला ट्रेंड नेमका आहे तरी काय ते जाणून घ्या...
धोनीच्या काही चाहत्यांना आता तो निवृत्त झाला असे वाटत आहे, तर काही जणांना धोनीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावे, असे वाटत आहे. याबाबत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.