मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्काराची रक्कम केली दान!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:59 AM2021-03-21T10:59:46+5:302021-03-21T11:00:27+5:30

whatsapp join usJoin us
Trent Boult donates his Player of the Match $500 prize money to hometown club, Video | मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्काराची रक्कम केली दान!

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्काराची रक्कम केली दान!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा खेळाडूनं आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात दमदार कामगिरी केली आणि त्यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. पण, त्यानं या पुरस्काररुपी मिळालेली ५०० डॉलरची रक्कम त्याच्या क्लबला दान केली. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. Rohit Sharma : वर्ल्ड कप ट्वेंटी-20त विराट कोहलीसोबत सलामीला खेळण्याबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातल्या मालिकेतील पहिला वन डे सामना शनिवारी खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यानं दमदार कामगिरी केली. त्यानं ८.५ षटकांत २७ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. जेम्स निशॅम व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत बोल्टला उत्तम साथ दिली आणि बांगलादेशचा डाव ४१.५ षटकांत १३१ धावांवर गडगडला. महमदुल्लाहने सर्वाधिक २७ धावा केल्या. विराट कोहलीची सामन्यानंतर मोठी घोषणा; टीम इंडियाचेच नव्हे, तर RCBचे चाहते झाले खूश

युनिव्हर्सिटी ओव्हल येथे वन डे सामन्यात बोल्टनं तिसऱ्यांदा ४+ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. असा विक्रम एकाही गोलंदाजाला जमलेला नाही. न्यूझीलंडनं हे लक्ष्य २१.२ षटकांत २ बाद १३२ धावा करून पार केले. मार्टीन गुप्तीलनं १९ चेंडूंत ३८ धावा ( ३ चौकार व ४ षटकार) केल्या. हेन्री निकोल्सनं नाबाद ४९ धावा केल्या. 
ट्रेंट बोल्ट Otumoetai Cadets क्लबकडून खेळतो. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्लब आर्थिक संकटात आले आणि त्यामुळे बोल्टनं ही छोटीशी मदत केली. ( Trent Boult won the Man of the Match award and donated the prize money of $500 to his club Otumoetai Cadets) 


 

 

Web Title: Trent Boult donates his Player of the Match $500 prize money to hometown club, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.