Join us  

BBL 2022 : ट्रेंट बोल्टने पहिल्या दोन चेंडूवर घेतल्या विकेट्स, झेल असा पकडला की साऱ्यांना बसला शॉक, Video 

Big Bash League : न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने बिग बॅश लीगमध्ये दमदार पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 4:42 PM

Open in App

Big Bash League : न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने बिग बॅश लीगमध्ये दमदार पदार्पण केले. मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टने पहिल्या दोन चेंडूंत सिडनी थंडर्सच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. मॅथ्यू जिल्केसने शॉर्ट फाईनच्या दिशेने मारलेला चेंडू राखीव खेळाडू बी काऊचने अप्रतिमरित्या टिपला. त्याचा हा झेल पाहून साऱ्यांना शॉक बसला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने मार्कस स्टॉयनिस व जो बर्न्स या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंना मैदानावर उतरवले, परंतु दोघांना काही खास खेळ करता आला नाही ( Marcus Stoinis and Joe Burns who tested positive for COVID19)  

मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२२ धावा केल्या. निक लार्किनने सर्वाधिक २५ धावा केल्या. जो बर्न्स १८ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. नॅथन कोल्टर नायलने १५ धावांचे योगदान दिले. सिडनी थंडर्सच्या गुरींदर संधू, फजलहक फारूकी व डॅनिएल सॅम्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. माफक धावांचा पाठलाग करणाऱ्या थंडर्सला बोल्टने पहिल्या दोन चेंडूवर धक्के दिले.  जिल्केस व रिली रोसोवू भोपळ्यावर गेले. कर्णधार जेसन संघाने २४ धावांची खेळी केली, तर अॅलेक्स हेल्स २४ धावांवर खेळतोय. थंडर्सच्या १५ षटकांत ६ बाद ८९ धावा झाल्या असून त्यांना ३० चेंडूंत ३४ धावा करायच्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बिग बॅश लीगन्यूझीलंड
Open in App