NZ vs NED : बोल्टचा अप्रितम झेल; पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

icc odi world cup 2023 : वन डे विश्वचषकात आज न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स आमनेसामने आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:09 PM2023-10-09T20:09:41+5:302023-10-09T20:09:58+5:30

whatsapp join usJoin us
 Trent Boult takes an amazing catch of bas de leede off the bowling of rachin ravindra in the NZ vs NED match at icc odi world cup 2023 | NZ vs NED : बोल्टचा अप्रितम झेल; पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

NZ vs NED : बोल्टचा अप्रितम झेल; पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

nz vs ned live match : पाकिस्तानविरूद्ध अष्टपैलू खेळी करून शेजाऱ्यांना घाम फोडणाऱ्या बेस डी लीडेचा अप्रतिम झेल घेऊन ट्रेन्ट बोल्टने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. वन डे विश्वचषकात आज न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स आमनेसामने आहेत. रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर मोठा फटकार खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या बेस डी लीडेच्या वाटेत बोल्ट काळ बनून आला. त्याने अप्रतिम झेल घेऊन नेदरलॅंड्सला मोठा झटका दिला अन् लीडे १८ धावांवर बाद झाला. खरं तर बेस डी लीडेने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ४ बळींसह ६७ धावांची खेळी करून कडवी झुंज दिली होती. 

तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने सांघिक खेळी करत मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर डेव्हिन कॉन्वे आणि विल यंग यांनी चांगली सुरूवात केली. न्यूझीलंडच्या सर्वच फलंदाजांनी आज हात साफ करून घेतल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या व्यासपीठावर खेळण्याचा अनुभव नसलेल्या नेदरलॅंड्समोर किवी संघाने धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३२२ धावा केल्या आणि नेदरलॅंड्सला ३२३ धावांचे तगडे लक्ष्य दिले.  

न्यूझीलंडकडून विल यंगला सर्वाधिक (७०) धावा करण्यात यश आले. तर, डेव्हिन कॉन्वे (३२), रचिन रवींद्र (५१), डेरिल मिशेल (४८) आणि टॉम लॅथमने (५३) धावा केल्या. किवी संघाच्या फलंदाजांनी नेदरलॅंड्सच्या सर्वच गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. अखेरच्या काही षटकांमध्ये अष्टपैलू मिचेल सॅंटनरने स्फोटक खेळी करताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी केली. नवख्या नेदरलॅंड्सच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत बलाढ्य न्यूझीलंडला ३२२ धावांपर्यंत कसेबसे रोखले. आर्यन दत्त, रयान क्लेन आणि रिलोफ वान डर मर्व यांना प्रत्येकी २-२ बळी घेता आले. तर पाकिस्तानविरूद्धचा सामना गाजवणारा बेस डी लीडेला एक बळी घेण्यात यश आले. नेदरलॅंड्सचा संघ पाकिस्तानकडून पराभूत होऊन इथपर्यंत पोहचला आहे, तर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून २०१९ च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. 

Web Title:  Trent Boult takes an amazing catch of bas de leede off the bowling of rachin ravindra in the NZ vs NED match at icc odi world cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.