Join us  

विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस IPLमध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 3:44 PM

Open in App

मुंबई : इंग्लंडचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ट्रेव्हर बायलीस यांना इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने करारबद्ध केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने यंदाचा वर्ल्ड कप जिंकला. 2015 मध्ये इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले. आयपीएलच्या आगामी हंगामात ते हैदराबाद संघाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने 2012 आणि 2014च्या आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने आज ही घोषणा केली. त्यांनी टॉम मुडी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता बायलीस प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. बायलीस यांच्या नावावर आयपीएलचे दोन जेतेपद आहेत, शिवाय त्यांनी सिडनी सिक्सर्स संघाला मार्गदर्शन करताना बिग बॅश लीग आणि चॅम्पियन्स लीगचेही जेतेपद पटकावले आहे. 

टॉममुडी यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात हैदराबाद संघाने पाच वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. 2016मध्ये हैदराबादने जेतेपदाचा चषकही उंचावला. 

 

 

टॅग्स :आयपीएलसनरायझर्स हैदराबादवर्ल्ड कप 2019इंग्लंडकोलकाता नाईट रायडर्स