Join us  

Shane Warne Tribute, Women's World Cup : भन्नाट स्पिन! ऑस्ट्रेलियाच्या महिला फिरकीपटूने लेग ब्रेकवर मिळवलेली विकेट शेन वॉर्नला केली समर्पित (Video)

चेंडू टप्पा पडून इतका वळला की बॅट हवेतच फिरली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 4:26 PM

Open in App

Shane Warne Tribute, Women's World Cup : ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं शुक्रवारी निधन झालं. त्याच्या निधनानंतर जगभरात खेळल्या गेलेल्या सर्व क्रिकेट सामन्यांमधून त्यांना विविध प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली. सध्या महिला विश्वचषक स्पर्धा सुरू असून शनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या इलाना किंग (alana king) हिने विकेट घेतल्यावर शेन वॉर्नला विशेष आदरांजली वाहिली.

ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा गोलंदाजी करत होता, त्यावेळी इंग्लंडची टॅमी ब्युमाँट फलंदाजी करत होती. डावाच्या २८व्या षटकात किंगने तिसऱ्या चेंडूवर लेग ब्रेक टाकला. टॅमीने पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू इतका वळला की बॅट हवेत फिरली पण चेंडूला लागली नाही. त्यानंतर मागे उभी असलेली यष्टिरक्षक अ‍ॅलिसा हिलीने फलंदाजाला सहज यष्टीचीत केलं. इलाना किंगने विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा केला आणि वॉर्नच्या निधनाबद्दल लावलेल्या काळ्या पट्टीकडे (आर्म-बँड) इशारा केला. म्हणजेच तिने ही विकेट शेन वॉर्नला समर्पित केली. किंग हिने लेग ब्रेकवर विकेट टिपली आणि शेन वॉर्न हा नेहमीच लेग स्पिनसाठी ओळखला जात असे. इलाना किंगच्या या विकेटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३१० धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून रॅचेल हेन्सने १३० धावा केल्या, तर कर्णधार मेग लॅगिंगने ८६ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडकडून नेट स्कायव्हरने ८५ चेंडूत १०९ धावा करत शतक झळकावले. पण ते व्यर्थ गेलं. कारण अखेर हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. इंग्लंडच्या संघाला ८ गडी गमावून २९८ धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी हा सामना जिंकला.

 

टॅग्स :शेन वॉर्नआॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App