कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) स्थगित करावे लागले. पण, याचकाळात कॅरेबियन प्रमिअर लीगच्या 2021 ( Caribbean Premier League 2021) यंदाच्या पर्वाची घोषणा केली गेली. ऑगस्ट महिन्यात ही लीग खेळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी सर्व संघांनी आपापल्या ताफ्यातील रिलीज व रिटेन खेळाडूंची नावं जाहीर केली. भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचा कोरोनाशी संघर्ष; उपचारासाठी विराट कोहलीनं केली 6.77 लाखांची मदत
CPL मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा ट्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) संघही खेळतो आणि नव्या पर्वाच्या सुरूवातीला त्यांनी चार खेळाडूंना रिलीज केले आहे. या चार खेळाडूंमध्ये भारताचा फिरकीपटू प्रवीण तांबे ( Pravin Tambe), न्यूझीलंडचा टीम सेईफर्ट, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू फवाद अहमद आणि ट्रिनिदादचा यष्टिरक्षक आमिर जांगू यांचा समावेश आहे. सेईफर्टनं नुकतीच कोरोनावर मात केली आहे.
नाईट रायडर्सनं ऑलराऊंडर ड्वेन ब्रोव्होला सेंट किट्स अँड नेव्हिस पेट्रियट्सकडून ट्रेड केले आहे. ब्राव्होला देऊन त्यांनी दिनेश रामदीनला ताफ्यात घेतले. मागील पर्वात किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली नाईट रायडर्सनं जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले होते आणि नंतर जेतेपदही नावावर केले होते.
भारताचा 48 वर्षीय प्रविण तांबे मागील पर्वात CPLमध्ये या संघाच्या ताफ्यात दाखल झाला होता. त्यानं तीन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकांच्या स्टाफमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. प्रविण तांबेनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
रिटेन केलेले खेळाडू - किरॉन पोलार्ड, सुनील नरीन, कॉलीन मुन्रो, डेरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, कॅरी पियरे, सिकंदर रजा, अँडरसन फिलिप, दिनेश रामदीन, टियोन वेबस्टर, अकील हुसैन, जायडन सील्स व अली खान