Join us  

CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक

कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) पहिल्या उपांत्य फेरीत किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:43 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) पहिल्या उपांत्य फेरीत किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं बाजी मारली. नाइट रायडर्सनं CPL2020 मध्ये सलग 11 विजयाची नोंद करताना फायनलमध्ये प्रवेश केला. मंगळवारी त्यांनी जमैका थलाव्हास संघावर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या थलाव्हास संघाला 20 षटकांत 7 बाद 107 धावाच करता आल्या. एनक्रुमाह बोन्नेर आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांनी संघर्ष केला. बोन्नेरनं 42 चेंडूंत 41, तर पॉवेलनं 35 चेंडूंत 33 धावा केल्या. रायडर्सच्या एकील होसैननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.  खेरी पिएरेनं 2, तर सुनील नरीन व फवाद अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर रायडर्सनं हे लक्ष्य सहज पार केलं. टिओन वेबस्टरने त्याला चांगली साथ दिली. सुनील नरीन ( 4) लगेच माघारी गेल्यानंतर वेबस्टर व सिमन्स यांनी दमदार खेळ केला. सिमन्सने 44 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या. वेबस्टरनं नाबाद 44 धावा केल्या. रायडर्सनं 15 षटकांत विजय मिळवला. रायडर्सनं 2017 व 2018 मध्ये CPL चे जेतेपद पटकावले आहे.  

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट