IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या पर्वासाठी २३ डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. त्यासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांची रिटेन केलेल्या व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) त्यांच्या संघात असलेल्या दोन राष्ट्रीय संघांच्या कर्णधारांना घरचा रस्ता दाखवला. कर्णधार केन विलियम्स आणि निकोलस पूरन यांना SRH ने रिलीज केले. विंडीजचा कर्णधार निकोलसने आज CG United Super 50 Cup 2022 स्पर्धेत खणखणीत शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीत ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता.
केन विलियम्ससाठी हैदराबादने सर्वाधिक १४ कोटी रुपये मोजले होते आणि तो ८ वर्ष या फ्रँचायझीसोबत खेळला. त्याने ७६ सामन्यांत ३६.२२ च्या सरासरीने २१०१ धावा केल्या. यापैकी ४६ सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्व सांभाळले. मागच्या पर्वात राशिद खान गुजरात टायटन्सकडे गेल्यानंतर हैदराबादने विलियम्सला संघात कायम राखण्यास प्राधान्य दिले. निकोलस पूरनसाठी त्यानी १०.७५ कोटी रुपये लिलावात मोजले होते. पण, या दोघांनाही रिलीज करण्याचा निर्णय SRH ने घेतला. केनने या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया दिली, तर निकोलसने मैदानावरील कामगिरीने त्यांना उत्तर दिले.
निकोलस पूरनचे कामगिरीतून उत्तर...विंडीजमध्ये सुरू असलेल्या CG United Super 50 Cup 2022 स्पर्धेत त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निकोलसने शतकी खेळी केली. त्याने ८३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकार खेचून १११ धावा चोपल्या. अमीर जांगू ( ८१), डॅरेन ब्राव्हो ( ५४) व अकिल होसैन ( ४२ धावा, २० चेंडू) यांनीही दमदार खेळ केला आणि संघाने ६ बाद ३१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोसनेही जोर लावला, परंतु त्यांना ८ बाद ३०२ धावा केल्या. रोशन प्रिमसने ७९ चेंडूंत १० चौकार व ९ षटकारांसह १३० धावांची खेळी केली, परंतु बार्बाडोसला विजय मिळवून देता आले नाही.
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad )
रिलीज केलेले खेळाडू - केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद
पर्समध्ये शिल्लक रक्कम - ४२.२५ कोटी
परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४
कायम राखलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"