Join us  

तुषार देशपांडे, वैभव भोईर लक्षवेधी

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कायम परिणामकारक ठरली आहे. जर का प्रथम फलंदाजी करताना या खेळपट्टीचा फायदा उचलला नाही, तर संघाला काहिच छाप पाडता येणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:24 AM

Open in App

- दिलीप वेंगसरकर लिहितात...वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कायम परिणामकारक ठरली आहे. जर का प्रथम फलंदाजी करताना या खेळपट्टीचा फायदा उचलला नाही, तर संघाला काहिच छाप पाडता येणार नाही. अशा परिस्थितीत जर का १७० हून अधिक धावा काढण्यात अपयश आले तर यासाठी फलंदाजांना स्वत:ला दोष द्यावे लागेल.हीच बाब आकर््स अंधेरी संघाबाबत पाहायला मिळाली. त्यांच्या फलंदाजांना धावफलकावर समाधानकारक धावा लावण्यात अपयश आले आणि संपूर्ण संघ कमी धावसंख्येत गारद झाला. ट्रिम्प नाइट्सने या सामन्यात सहज बाजी मारली. या सामन्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेचा मारा पाहून मी प्रभावित झालो. त्याची गुणवत्ता नक्कीच लक्षवेधी ठरली. त्याच्याकडे, वेग आहेच त्याचबरोबर गोलंदाजीतील वैविध्य, वेगवान गोलंदाजाकडे असणारी वृत्ती आणि बिनधास्त पणे मारा करण्याची क्षमताही आहे. झहीर खानची मेंटॉरच्या रुपात असलेली उपस्थिती तुषारसाठी नक्कीच फायदेशीर ठरली. झहीरचा वेग आणि चेंडू स्विंग करण्यात हातखंडा आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभव त्याच्या पाठिशी आहे.तुषार व्यतिरिक्त डावखुरा फिरकीपटू वैभव भोईरची गोलंदाजीही लक्षवेधी ठरली. त्याने अचूक आणि चतुरतेने मारा करत फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडले. माझ्यामते कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचा चांगल्याप्रकारे वापर केला. तरीही जर का अशा गोलंदाजांचा आणखी योग्य प्रकारे वापर केल्यास ते सामना जिंकण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतात. तरी वैभवने आपल्या वयोमानानुसार काहीसे उशीराने टी२० क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र तरीही तो भारताचा दिग्गज डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशी यांच्याप्रमाणे छाप पाडू शकतो. दोशी यांनी वयाच्या ३२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करताना १०० हून अधिक बळीही मिळवले आहेत.युवा अष्टपैलू आकाश पारकरनेही शानदार कामगिरी केली आहे. तो उत्तम गोलंदाज असून केवळ बळी घेण्याची क्षमता न राखता, चांगल्याप्रकारे फटकेबाजीही करु शकतो. त्याचा संघ उर्वरीत सामन्यांसाठी नक्कीच त्याला आणखी संधी देईल, याची खात्री आहे. (पीएमजी)