कोलकात्ता : भारतात २०२१ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे रुपांतर विश्व टी-२० स्पर्धेत करण्याचा निर्णय आंतराष्टÑीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी घेतला.
आयसीसीच्या बैठकीच्या समारोपानंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी ही माहिती दिली. भारतात आता २०२१ मध्ये १६ देशांदरम्यान टी-२० स्पर्धा होणार आहे. यामुळे सलग दोन वर्ष आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे होणार आहे. आॅस्ट्रेलियामध्ये २०२० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारताने सुरुवातीला या निर्णयाचा विरोध केला होता.
रिचर्डसन म्हणाले, ‘क्रिकेटच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात होणाºया चॅम्पियन ट्रॉफीला आता विश्व टी-२० स्पर्धेत बदलण्यात आले असून हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे.’
Web Title: Twenty20 World Cup tournament instead of Champions Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.