Join us  

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 'Twitter' कडून दणका; पण नंतर घेतली माघार!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला शुक्रवारी 'Twitter' कडून मोठा दणका बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 3:43 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला शुक्रवारी 'Twitter' कडून मोठा दणका बसला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसला तरी त्याच्या फॉलोअर्सची संख्या ही ८२ लाखांच्या घरात आहे. धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. नुकताच त्यानं कुटुंबीयांसोबत शिमला व दुबई दौरा केला होता. त्यानंतर तो त्याच्या नव्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला होता. पण, आज ट्विटरनं उचललेल्या एका पाऊलमुळे सोशल मीडियावर धोनीचीच चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेनंतर ट्विटरनं माघार घेतली. 

 बजरंग लढला, पण 'सुवर्ण'शर्यतीतून बाहेर पडला, कांस्यपदकासाठी खेळावे लागणार

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात  ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३  धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.

Tokyo Olympics: टीम इंडियाचा कर्णधार मनप्रीत सिंग पत्नीला गिफ्ट करणार रेंज रोव्हर; मलेशियन मुलीशी केलंय लग्न!

पण, शुक्रवारी ट्विटरनं Mahendra Singh Dhoni या ट्विटर हँडलची ब्लू टीक काढली.. ट्विटरवर ८ जानेवारी २०२१ला धोनीनं अखेरचं ट्विट केलं होतं आणि मागील अनेक महिने या हँडलचा वापर न झाल्यानं ट्विटरनं ब्लू टीक मार्क काढली ( Twitter has removed the Blue Tick from MS Dhoni's account as he's inactive for months) पण, ट्विटरनं माघार घेत पुन्हा धोनीला ब्लू टिक दिली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीट्विटर
Open in App