इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला का? भारताकडे मदत मागणाऱ्या Shoaib Akhtarला तिखट सवाल

भारतात आतापर्यंत 5500 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर पाकिस्तानातील हा आकडा 4000 पर्यंत पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:57 PM2020-04-09T16:57:23+5:302020-04-09T16:58:16+5:30

whatsapp join usJoin us
Twitterati questions Shoaib Akhtar on 10,000 ventilators' request from India svg | इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला का? भारताकडे मदत मागणाऱ्या Shoaib Akhtarला तिखट सवाल

इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला का? भारताकडे मदत मागणाऱ्या Shoaib Akhtarला तिखट सवाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत 15 लाखांच्या वर गेली आहे आणि 90 हजारापर्यंत लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकट काळात जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दोन्ही देशांतील सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

अमेरिकेत अडकला भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू; प्रकृती खालावली

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानला 10000 व्हेंटिलेटर द्या अशी विनंती अख्तरनं केली असून पाकिस्तान हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असेही तो म्हणाला. इंडियन एक्स्प्रेसनं या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अख्तर म्हणाला,''भारतानं आम्हाला 10 हजार व्हेंटिलेटरची मदत केल्यास, आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण, मी आता क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव ठेवत आहे. पण, अंतिम निर्णय सरकरानं घ्यावा.'' 

शोएब अख्तरच्या या विनंतीनंतर नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला. काही नेटिझन्सनी तर त्याला पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला का, असा तिखट सवाल केला.



 


दरम्यान, त्यानं भारत-पाकिस्तान वन डे मालिकेचा प्रस्तावही ठेवला आहे. तो म्हणाला,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!

भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...

युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल

भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...

Corona Virus : ... तर भारताचे हे उपकार पाकिस्तान कधीच विसरणार नाही, शोएब अख्तर

अमित मिश्रा, मिताली राज यांचा गरजूंसाठी पुढाकार; करतायत अन्नदान

भारताला पैशांची गरज नाही, खेळाडूंच्या जीवाशी का खेळायचं? कपिल देव यांनी अख्तरला फटकारलं

  

Web Title: Twitterati questions Shoaib Akhtar on 10,000 ventilators' request from India svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.