भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग समाजकार्यातही नेहमी आघाडीवर राहिला आहे. मैदानावर बिनधास्त, निडर असलेला वीरू मैदानाबाहेर मात्र हळवा, भावनिक आहे, याचे अनेकदा प्रत्यय आलाच आहे. पण, त्यानं आत जे कार्य केलं आहे, ते पाहून कोणाच्याही मनात त्याच्याबद्दलचा आदर अधिक पटीनं नक्की वाढेल. सोशल मीडियावर त्यानं या समाजकार्याची माहिती दिली आणि नेटिझन्सने वीरूला डोक्यावर घेतलं.
14 फेब्रुवारी 2019, हा दिवस भारतीय कधीच विसणार नाही. भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात आपले 40 CRPF जवान शहीद झाले होते. पुलवामा दशहतवादी हल्ला, असं कानावर जरी आलं तरी आपण खडबडून जातो. या हल्ल्यानंतर भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले, परंतु त्यातून शहीद जवानांची उणीव कधीच भरून निघणारी नाही. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना सेहवाग त्याच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण देत आहे. सोशल मीडियावरून त्यानं ही माहिती दिली.
गौतम गंभीरने वचन पाळले; शहीद जवानांच्या मुलांचा उचलणार खर्चभारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार असल्याचे गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
देशासाठी सेवा बजावताना शहिद झालेल्या जवानांच्या मुलांना मदत करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. जीजी फाउंडेशन तर्फे आम्ही 100 शहीद मुलांच्या मुलांची काळजी घेत आहोत. त्यांच्या पूर्वजांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले आणि आता आपण किती कृतज्ञ आहोत हे दाखवण्याची आमची वेळ असल्याचे गौतम गंभीरने सांगितले आहे.