नवी दिल्ली : आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावेल, अशी सर्वांनच खात्री आहे. मागील वर्षभरात भारतीय संघाने परदेशात विजयी तिरंगा फडकवला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी दोन फलंदाज डोकेदुखी ठरू शकतात असे स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितले आहे.
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप पटकावली. कारण त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. एक वर्षांची बंदी झेलल्यानंतर तो आयपीएलमध्ये उतरला होता. त्यानंतर मात्र त्याने धावांची टांकसाळच उघडली होती. वॉर्नर हा भारतासाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा पहिला खेळाडू असेल, असे भुवनेश्वरला वाटते.
याबाबत भुवनेश्वर म्हणाला की, " वॉर्नर हा सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे. पण वॉर्नरबरोबरच वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल भारतासाठी सर्वात जास्त डोकेदुखी ठरू शकतो. कारण हे दोन्ही खेळाडू सामना एकहाती फिरवू शकतात. त्यामुळे हे दोघे भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात."
भारताच्या विश्वचषकाच्या संघात उणीव, सांगतोय गौतम गंभीर
भारताचा संघ आता विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. २२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. भारताचा संघ समतोल असल्याचे बरेच जण म्हणत असले तरी या संघात उणीव असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटत आहे. त्यामुळे भारताचा संघ विश्वचषकासाठी समतोल नसल्याचे गंभीरने म्हटले आहे.
भारताच्या संघाबाबत गंभीर म्हणाला की, " इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्ट्या या भारतापेक्षा नक्कीच वेगळ्या आहेत. भारतीय संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन वेगवान गोलंदाज आहेत. पण त्यांना साथ देण्यासाठी संघात चौथा वेगवान गोलंदाज असायला हवा होता. संघात हार्दिक पंड्या आणि विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू आहेत. पण तरीही संघाला चौथा वेगवान गोलंदाज असायला हवा होता."
रिषभ पंत विश्वचषकाच्या संघात का नाही, सांगतोय विराट कोहली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच इंग्लंडमध्ये अनुभवी खेळाडूची आवश्यकता असल्याने कार्तिकची निवड करण्यात आल्याचे निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेवर पडदा पडला होता. पण आता तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंत संघात का नाही, याचे कारणही दिले आहे.
Web Title: 'this' two batsmans can be a headache for India in World Cup, says Bhuvneshwar Kumar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.