- अयाज मेमनबंगळुरू : प्ले ऑफमध्ये स्थान पटकविण्यास उत्सुक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात केवळ आणि केवळ विजयाचीच गरज असेल. त्यासाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांनी धडाका दाखवावा, अशी आशा आहे. सामन्यादरम्यान पाऊस 'खलनायक' ठरू शकतो.
स्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७:३० पासूनरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू■ कोहली, डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांना खेळपट्टीवर स्थिरावण्यास यश आल्यास धावा निघतील.■ मोहम्मद सिराज, पार्नेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा यांच्यावर धावा रोखण्याची आणि बळी घेण्याची जबाबदारी असेल.गुजरात टायटन्स■ कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाने शानदार कामगिरी केली. शुभमन गिल, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया हे आक्रमक फलंदाज.■ अनुभवी मोहम्मद शमी, राशिद खान, मोहित शर्मा यांच्यामुळे संघाची गोलंदाजीही अत्यंत भेदक ठरते.
मुंबईचा सनरायजर्सवर मोठ्या विजयाचा निर्धारमुंबई: पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर मोठ्या विजयाची गरज असेल. सनरायजर्स आधीच बाहेर झाला, तर मुंबईला अद्याप आशा आहे. वानखेडेवर मुंबईने चार विजय नोंदविले, तर दोनवेळा संघ पराभूत झाला.. रोहितच्या संघाला येथे धावगतीही सुधारावी लागणार आहे.
स्थळ : वानखेडे स्टेडियम, वेळ : दुपारी ३:३० पासूनमुंबई इंडियन्स■ डेथ ओव्हरमधील खराब गोलंदाजी ही मुख्य डोकेदुखी आहे. रोहित फॉर्ममध्ये नाही; पण सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरन ग्रीन, ईशान किशन, नेहल वढेरा धावा काढत आहेत.■ क्रिस जॉर्डन, अर्शद खान, जेसन बेह- रेनडॉर्फ, पीयूष चावला यांना टिच्चून मारा करावा लागेल.
| सनरायजर्स हैदराबाद■ ऐडन मार्करामच्या संघाकडे गमविण्या- सारखे काहीच नाही. विजयी निरोप देण्याची ही चांगली संधी असेल. आरसीबीविरुद्ध क्लासेनच्या शतकानंतरही पराभव पत्करावा लागला होता.मार्को यात्सेन, भुवनेश्वर, नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रुक यांच्यावर गोलंदाजीची भिस्त.