इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघातून (Indian Cricket Team) चिंता वाढविणारी बातमी आली आहे. टीम इंडियाचे दोन खेळाडूं कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आढळून आले आहेत. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपनंतर ब्रेकवर आहे. जे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांपैकी एक रिकव्हरही झाला आहे. तर दुसऱ्या खेळाडूची लवकरच चाचणी केली जाईल.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, या दोन्ही खेळाडूंमध्ये थंडी वाजणे आणि खोकला येणे, अशी सामान्य लक्षणं दिसून आली होती. मात्र, दोघांचीही प्रकृती आता व्यवस्थित आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर एक खेळाडू आता चाचणीत नेगेटिव्हही आला आहे. तर दुसऱ्या खेळाडूची चाचणी 18 जुलैला कोली जाईल. 18 जुलैला आयसोलेशनमध्ये खेळाडूचा दहावा दिवस असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुसऱ्या खेळाडूची चाचणी होईल. निगेटिव्ह आल्यास लवकरच तो खेळाडूही संघाच्या कॅम्पमध्ये सामील होईल.20 तारखेपासून सराव सामना -इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खेळला जाणार आहे. त्यापूर्वी 20 जुलैपासून भारतीय संघाला एक काउंटी सामना खेळायचा आहे. हा तीन दिवसीय सराव सामना असेल.
टीम इंडियाचे सर्वच खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलनंतर ब्रेकवर होते. यादरम्यान सर्वच खेळाडू यूकेत होते आणि आपल्या कुटुंबासह वेळ घालवत होते. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंना कॅम्पमध्ये एकत्र यायचे होते.