Join us  

श्रीलंकेला धक्का, कर्णधार उपुल थरंगावर दोन सामन्याची बंदी

कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडेमध्ये विजय मिळवण्यासाठी आतुर असलेल्या श्रीलंकेला धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वनडे कर्णधार उपुल थरंगावर आयसीसीने दोन सामन्याची बंदी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 10:57 PM

Open in App

पल्लेकल, दि. 25 - कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडेमध्ये विजय मिळवण्यासाठी आतुर असलेल्या श्रीलंकेला धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वनडे कर्णधार उपुल थरंगावर आयसीसीने दोन सामन्याची बंदी घातली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेमध्ये षटकांची गती न राखल्यामुळे उपुल थरंगावर दोन सामन्याची बंदी घातली आहे. तर सलामीवीर दानुष्का गुणाथिलकाला खांद्याला झालेल्या दुखपतीमुळे दोन सामने खेळू शकत नाही.यापूर्वीही चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये षटकांची गती न राखल्यामुळे दोन सामन्याची बंदी घातली होती. उपुल थरंगावर बंदी घातल्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार दिनेश चंदीमल आणि लाहिरु थिरिमानेला संघात सामिल करण्यात आले आहे. मिळालेल्या सुत्रानुसार , उपुल थरंगाच्या अनुपस्थित दिनेश चंदीमल संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे सांभाळेल.दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जादुई फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याच्या ह्यगुगलीह्णसमोर १२ धावांत ६ विकेट गमावणा-या भारताने महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रतिकूल परिस्थितीत खेळलेल्या जिगरबाज खेळीच्या बळावर श्रीलंकेवर दुस-या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात डकवर्थ लुईस नियमाद्वारे ३ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. त्यांचा आघाडीची आणि फलंदाजीची मधली फळी पुन्हा कोसळली. अशातच मिलिंदा श्रीवर्धना (५८) आणि चमारा कापुगेदरा (४0) यांनी सहाव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेला ८ बाद २३६ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. एकवेळ भारताची स्थिती ७ बाद १३१ अशी दयनीय होती; परंतु माजी कर्णधार धोनी (नाबाद ४५) आणि भुवनेश्वर कुमार (नाबाद ५३) यांनी आठव्या गड्यासाठी १00 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांच्या जिगरबाज भागीदारीमुळे भारताने ४४.२ षटकांत ७ बाद २३१ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला तसेच पाच सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी आघाडी घेतली.त्याआधी श्रीलंकेने दुसºया सामन्यात धनंजय याने (५४ धावांत ६ बळी) त्याच्या कारकीर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर विजयाकडे मार्गक्रमण केले होते; परंतु भुवनेश्वर आणि धोनी यांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. या दोघांनी आठव्या गड्यासाठी विक्रमी शतकी भागीदारी केली. याआधी २00९ मध्ये हरभजनसिंग आणि प्रवीणकुमार यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध वडोदरा येथे ८४ धावांची भागीदारी केली होती. धोनीने आजच्या खेळीने आपल्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने ६८ चेंडूंत एक चौकार मारला.- दबावात कशी फलंदाजी करायची हे धोनीनेच सांगितलं- भुवनेश्वर कुमारभारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने(नाबाद 53) महेंद्रसिंग धोनीला(नाबाद 45) साथ देत फटकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने हातून निसटत चाललेल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. धोनीने मला कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळी करण्यास सांगितलं होतं अशी प्रतिक्रिया भुवनेश्वर कुमारने विजयानंतर दिली.''जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो त्यावेळी धोनीने मला कसोटी क्रिकेटप्रमाणे नॅचरल गेम खेळण्यास सांगितलं. खूप षटकं बाकी आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नकोस. जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ मैदानावर तग धरून उभा राहा, असं त्याने मला सांगितलं. मैदानावर वेळ घालवल्यानंतर आम्ही विजय मिळवू याचा आम्हाला विश्वास होता. मी फलंदाजीसाठी उतरलो त्या परिस्थितित गमावण्यासारखं आमच्याकडे काहीच नव्हतं. कारण आमच्या 7 विकेट गेल्या होत्या. शक्य तेवढी धोनीची साथ द्यायची असाच विचार मी केला होता आणि मी तोच प्रयत्न केला'' असं सामना संपल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला.

टॅग्स :क्रिकेटश्रीलंका