लंडन : इंग्लंडने सरेचा सलामीवीर फलंदाज मार्क स्टोनमॅन व हॅम्पशायरचा लेग स्पिनर मॅसन क्रेन यांना वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील आठवड्यात एजबेस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी १३ सदस्यांच्या संघात स्थान दिले आहे.इंग्लंडचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना राहील. त्यात स्टोनमॅन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. किटन जेनिंग्स सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या स्थानी स्टोनमॅनला संधी मिळाली आहे. अॅण्ड्य्रू स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर स्टोनमॅन अॅलिस्टर कुकचा सलामीला १२ वा जोडीदार ठरू शकतो.क्रेनला लियाम डासनच्या स्थानी संघात स्थान मिळाले आहे. डासन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळला होता; पण त्याला छाप सोडता आली नाही. ख्रिस व्होक्स दुखापतीतून सावरत असून, तो या लढतीत पुनरागमन करणार आहे. (वृत्तसंस्था)पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ असा :जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉन बेयरस्टॉ, स्टुअर्ट ब्रॉड, अॅलिस्टर कुक, मॅसन क्रेन, डेव्हिड मलान, टोबी रोलँड जोन्स, बेन स्टोक्स, मार्क स्टोनमॅन, टॉम वेस्ली व ख्रिस व्होक्स.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इंग्लंड संघात दोन नवे चेहरे : दिवस-रात्र कसोटी
इंग्लंड संघात दोन नवे चेहरे : दिवस-रात्र कसोटी
इंग्लंडने सरेचा सलामीवीर फलंदाज मार्क स्टोनमॅन व हॅम्पशायरचा लेग स्पिनर मॅसन क्रेन यांना वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील आठवड्यात एजबेस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी १३ सदस्यांच्या संघात स्थान दिले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:09 AM