मेलबोर्न : भारतीय संघ यंदा डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल होताच खेळाडूंना अॅडिलेड येथे दोन आठवडे क्वाारंटाईन राहावे लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी म्हटले आहे.
‘दोन आठवडे क्वारंटाईन कालावधी हा योग्य आणि गरजेचा आहे. त्यात बदल होणार नाही. पण भारतीय संघ जिथे क्वारंटाईन होईल, त्या ठिकाणी खेळाडूंना सरावासाठी पूर्ण सोय करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मत घेऊन भारतीय खेळाडूंना सरावाची पूर्ण संधी मिळेल, याची काळजी घेतली जाईल,’असे हॉकले यांनी ‘ईएसपीएन क्रिकइन्फोशी’ बोलताना सांगितले.
आयपीएल संपल्यानंतर भारतीय खेळाडू यूएईमधूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ही मालिका जैव सुरक्षा वातावरणात खेळवली जाणार असून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनादेखील परतल्यानंतर भारतीय खेळाडूंसारखे दोन आठवडे क्वारंटाईन व्हावे लागेल. अॅडिलेडमधील हॉटेल हे स्टेडियमशी जुळलेले असल्याने येथे काहीही अडचण जाणार नाही. (वृत्तसंस्था)
आयसीसीच्या नवीन नियमानुसार कोणत्याही दौºयावर जाण्याआधी प्रत्येक संघाला दोन आठवडे क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. तथापि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय खेळाडूंना दोन आठवडे हॉटेलमध्ये बसवून ठेवणे योग्य होणार नाही, क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा, अशी विनंती सीएकडे केली होती. सीएने ही विनंती फेटाळली आहे.
Web Title: A two-week quarantine period for India; Ganguly's demand was rejected
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.