मुंबई : भारताच्या एका खेळाडूवर दोन वर्षांती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयपीएलपूर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
कोलकाताच्या संघाने या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते. या खेळाडूकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा होत्या. या हंगामात केकेआरच्या संघात महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. या बदलांमध्ये या खेळाडू महत्वाची भूमिका पाहायला मिळाली असती. पण आता दोन वर्षे तरी या खेळाडूला क्रिकेट खेळता येणार नाही.
भारताने २०१८ साली १९- वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात या खेळाडूने महत्वाची भूमिका बजावली होती. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत या खेळाडूने शतक झळकावले होते. अंतिम फेरीत या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. या खेळाडूवर वयचोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आरोप आता सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली क्रिकेट संघटनेची काल वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी संघटनेतील लोकपाल यांनी या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता हा खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. हा केकेआरचा खेळाडू आहे मनोज कालरा. आता वयचोरीचा आरोप सिद्ध झाल्यामुळे मनोजला दोन वर्षे खेळता येणार नाही.