Join us  

Parshavi Chopra : वयाच्या 16 व्या वर्षी श्रीलंका टीमला घुमवणारी पार्शवी चोप्रा कोण आहे?

साउथ आफ्रिकेमध्ये महिला टी20 अंडर-19 विश्वकप सुरू आहे. काल भारतीय टीमने श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करत विजय मिळवला.  भारतीय टीमने श्रीलंका टीमचा 7 विकेट्सने पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:51 AM

Open in App

साउथ आफ्रिकेमध्ये महिला टी20 अंडर-19 विश्वकप सुरू आहे. काल भारतीय टीमने श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करत विजय मिळवला.  भारतीय टीमने श्रीलंका टीमचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा श्रीलंका टीमने फलंदजी केली. यात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स घेत फक्त 59 धावा बनवल्या. भारतीय टीमने 7.2 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करत सामना जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. 

टीम इंडियामध्ये नवी गोलंदाज पार्शवी चोप्राने कमाल केली. 16 वर्षीय या गोलंदाजाने श्रीलंका टीमला अक्षरशा घुमवले.  या सामन्यात पार्शवी संघासाठी चार षटके टाकली. यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंना धावांसाठी चांगलेच झगडावे लागले.

पार्शवीने आपल्या चार षटकांत केवळ 5 धावा दिल्या, यात एक एक धाव वाइड बॉलची होती, तर तिने एकूण 4 विकेट्स घेतल्या. यामुळेच टीम इंडियाने श्रीलंका टीमला फक्त 9 धावांवर थांबवून टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा केला.

पार्शवी चोप्रा कोण आहे?

16 वर्षाची पार्शवी चोप्रा उत्तर प्रदेश येथील बुलंदर शहरातील आहे. पार्शवी 10 वर्षाची असतानाच ग्रेटर नोएडा येथून क्रिकेटचे ट्रेनिंग घेतले. विश्वचषकाअगोदर पार्शवी चोप्रा हिला गेल्या वर्षी न्यूझिलंड विरुद्धच्या अंडर-19 मध्ये टीममध्ये स्थान दिले होते. 

पार्शवी चोप्रा ग्रेटर नोएडा येथील युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सलन्सची विद्यार्थिनी आहे. ज्यावेळी पार्शवीची विश्वचषक संघात निवड झाली होती, तेव्हा तिला स्वत:वर विश्वास बसला नव्हता. तिने एका मुलाखतीमध्ये या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. 'इतक्या लहान वयात माझी अंडर-19 मध्ये भारतासाठी निवड होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. बीसीसीआयच्या वेबसाइटवर जेव्हा मी संघात माझे नाव पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. संघात निवड झाल्यानंतर मला खूप आनंद झाला, असंही पार्शवी म्हणाली. 

पार्शवी चोप्राने 5 धावांत 4 बळी घेतले; भारतीय महिलांनी 7.2 षटकांतच श्रीलंकेला केलं चितपट 

पार्शवी चोप्रासह या सामन्यात सौम्या तिवारीने धमाकेदार फलंदाजी केली. सौम्याने 15 चेंडूत 28 धावांची जलद खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकारही मारले.

टॅग्स :ऑफ द फिल्डबीसीसीआय
Open in App