ब्लोमफोंटेन - शानदार फार्मात असलेल्या भारतीय संघासमोर १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी नेपाळचे आव्हान असेल. नेपाळला नमवून उपांत्य फेरीत दमदार पाऊल टाकण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.
सुपर सिक्समधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. पाकिस्तान (प्लस १.०६) आणि भारत (प्लस ३.३२) दोन्ही संघांचे सहा गुण आहेत. पण, सरासरी धावसंख्या चांगली असल्याने भारतीय संघ आघाडीवर आहे. उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंत पराभूत झालेला नाही. तसेच नेपाळसारख्या कमकुवत संघाकडून कोणत्याही धक्कादायक निकालाची अपेक्षा नाही. भारताने गटसाखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. तर नेपाळने एकही सामना जिंकलेला नाही. मुंबईचा फलंदाज सरफराजचा लहान भाऊ मुशीर खानने ८१पेक्षा अधिक सरासरीने दोन शतकांसह ३२५ धावा केल्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघ भारत : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरवेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी. नेपाळ : देव खानाल (कर्णधार), अर्जुन कुमल, आकाश त्रिपाठी, दीपक प्रसाद डुमरे, दुर्गेश गुप्ता, गुलशन कुमार झा, दीपेश प्रसाद कांडेल, बिशाल बिक्रम केसी, सुभाष भंडारी, दीपक बोहारा, उत्तम रंगु थापा, बिपिन रावल, तिलक राज भंडारी, आकाश चंद.