What A Match! ९२ धावांचे लक्ष्य पण अफगाणिस्तानची कडवी झुंज; न्यूझीलंडचा निसटता विजय

U19 World Cup 2024: अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडने एक गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:51 PM2024-01-23T18:51:20+5:302024-01-23T18:51:35+5:30

whatsapp join usJoin us
 U19 World Cup 2024 NZ U-19 vs AFG U-19 New Zealand beat Afghanistan by 1 wicket  | What A Match! ९२ धावांचे लक्ष्य पण अफगाणिस्तानची कडवी झुंज; न्यूझीलंडचा निसटता विजय

What A Match! ९२ धावांचे लक्ष्य पण अफगाणिस्तानची कडवी झुंज; न्यूझीलंडचा निसटता विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NZ U-19 vs AFG U-19: सध्या दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षाखालील वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडने निसटता विजय मिळवला. आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला १०० धावा देखील उभारता आल्या नाही अन् अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ९१ धावांत आटोपला. 

अफगाणिस्तानला स्पर्धेतील सलग दुसरा सामना गमवावा लागला. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानविरूद्ध २८५ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची फलंदाजी १०३ धावांवर संपुष्टात आली. तर, आज अफगाणिस्तानविरूद्ध विजय मिळवून न्यूझीलंडने आपला विजयरथ कायम ठेवला. सलामीच्या सामन्यात किवी संघाने नेपाळचा ६४ धावांनी पराभव केला होता. 

न्यूझीलंडचा निसटता विजय  
अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना २१.३ षटकांत सर्वबाद ९१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट रोवने सर्वाधिक ५ बळी घेऊन अफगाणिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याच्याशिवाय Ryan Tsourgas आणि Ewald Schreuder यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर, कर्णधार ऑक्सर जॅक्सनने एक बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या ९१ धावांत गुंडाळले. 

माफक ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला घाम फुटला. ३०० चेंडूत केवळ ९१ धावांचे आव्हान असताना देखील किवी संघाला १ गडी राखून निसटता विजय मिळवता आला. अफगाणिस्तानच्या संघाने ९२ धावांचा बचाव करताना अप्रतिम कामगिरी केली. सांघिक खेळीच्या जोरावर त्यांंनी किवी फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अखेर न्यूझीलंडने २८.२ षटकांत ९ बाद ९२ धावा करून कसाबसा विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी एकमेकांना साथ देत छोटी धावसंख्या असतानाही सामन्यात रंगत आणली. 

Web Title:  U19 World Cup 2024 NZ U-19 vs AFG U-19 New Zealand beat Afghanistan by 1 wicket 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.