U19 World Cup: अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघानं गुरुवारी इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेविरुद्धच्या या लढतीत अफगाणिस्ताननं १३४ धावांचा यशस्वी बचाव केला. अफगाणिस्तानच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली, तर बिलाल सामीनं दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला १३० धावांवरच समाधान मानावे लागले. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावरच भन्नाट डान्स केला.
श्रीलंकेला विजयासाठी २५ चेंडूंत ५ धावाही करता आल्या नाही. त्यांचा अखेरचा फलंदाज रनआऊट होऊन माघारी परतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून अल्लाह नूर ( २५), अब्दुल हादी ( ३७), नूर अहमद ( ३०) यांनी चांगला खेळ केला, परंतु त्यांचा संघ ४७.१ षटकांत १३४ धावा करू शकला. श्रीलंकेच्या विंजुआ रनपूलनं पाच विकेट्स घेतल्या. दुनिथ वेल्लालागेनं तीन बळी टिपले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांनी अती घाईत चार विकेट्स रन आऊटमध्ये गमावल्या. कर्णधार दुनिथनं सर्वाधिक ३४, तर रवीन डी सिल्वानं २१ धावा केल्या.
Web Title: U19 World Cup: Afghanistan defend 134 to beat Sri Lanka by four runs, reach semi-final, Celebration of Afghanistan players Video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.