U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : ... तर भारताचा वर्ल्ड कप झालाच समजा; गोलंदाजांचे वर्चस्व, वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडच्या धावगतीला लावला लगाम 

U19 World Cup Final, India vs England Live Updates : २४ वर्षांनंतर १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 09:56 PM2022-02-05T21:56:55+5:302022-02-05T21:57:19+5:30

whatsapp join usJoin us
U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : India need 190 runs to win the U19 World Cup for a record breaking 5th time, James Rew 95 runs from 116 balls , Five wicket haul for Raj Bawa | U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : ... तर भारताचा वर्ल्ड कप झालाच समजा; गोलंदाजांचे वर्चस्व, वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडच्या धावगतीला लावला लगाम 

U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : ... तर भारताचा वर्ल्ड कप झालाच समजा; गोलंदाजांचे वर्चस्व, वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडच्या धावगतीला लावला लगाम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

U19 World Cup Final, India vs England Live Updates : २४ वर्षांनंतर १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. राज बावाने ( Raj Bawa) आजच्या सामन्यात राज गाजवले असले तरी इंग्लंडच्या जेम्स रेवने ( James Rew ) थरार कायम राखला. ६ बाद ६१ अशा अवस्थेतून जेम्सने इंग्लंडचा डाव सावरताना ८ व्या विकेटसाठी जेम्स सेल्ससह ( James Sales ) विक्रमी भागीदारी केली.  १०० चा आत इंग्लंडचा डाव गुंडाळला जाईल, असे वाटत असताना जेम्स रेव व जेम्स सेल्स यांच्या भागीदारीने भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. जेम्स रेवचे थोडक्यात शतक हुकले असले तरी त्याची खेळी ही १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा फायनलच्या इतिहासात अजरामर झाली. रवी कुमारने ३४ धावांत ४, तर राज बावाने ३१ धावांत ५ विकोट्स घेतल्या. 


भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.   इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही.  नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, रवी कुमारने दुसऱ्या व चौथ्या षटकात इंग्लंडला जोरदार धक्के दिले. त्याने प्रथम जेकब बेथेल ( २) LBW केले आणि त्यानंतर कर्णधार टॉम प्रेस्टचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. जॉर्ज थॉमस व जेम्स रेव या जोडीनं इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारताचा कर्णधार यश धुल याने राज बावाला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्याने  पहिल्या दोन षटकांत १ निर्धाव षटक फेकून १ धाव दिली. 


११व्या षटकानंतर सामना पूर्णपणे इंग्लंडच्या हातून  निसटला. राज बावाने सलामीवीर जॉर्ज थॉमसला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर १३व्या षटकात राज बावाने इंग्लंडला आणखी दोन धक्के दिले. विलियम लक्स्टन ( ४) व जॉर्ज बेल ( ०) हे बाद झाल्यामुळे इंग्लंडची अवस्था ५ बाद ४७ अशी दयनीय केली. त्यात पुन्हा १७व्या षटकात राज बावाने रेहान अहमद ( १०) याला बाद करून इंग्लंडचा सहावा गडी माघारी पाठवला. राज बावाने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकांत १९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्यात एक निर्धाव षटक होते. कौशल तांबेने इंग्लंडला ७वा धक्का देताना अॅलेक्स हॉर्टनला ( १०) बाद केले. 

जेम्स रेव दुसऱ्या बाजूने संघर्ष करताना दिसला. त्याने ७९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. जेम्स रेव वे जेम्स सेल्स यांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडचा डाव सावरला. इंग्लंडचा संघ सहजपणे धावा करताना दिसला. ४४व्या षटकात रवी कुमारला पाचारण करणे टीम इंडियाला फलदायी ठरले. ११६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावा करणारा जेम्स रेवचा अफलातून झेल कौशल तांबेने टिपला. यासह ८व्या विकेटसाठीची ९३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवी कुमारने आणखी एक धक्का देताना थॉमस अॅस्पिनवॉलला ( ०) बाद केले. राज बावाने इंग्लंडच्या अखेरच्या फलंदाजाला बाद करून सामन्यात पाच विकेट्स पूर्ण केल्या. इंग्लंडचा संघ १८९ धावांत माघारी परतला. 

Web Title: U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : India need 190 runs to win the U19 World Cup for a record breaking 5th time, James Rew 95 runs from 116 balls , Five wicket haul for Raj Bawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.