माऊंट माऊंगानुई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम अंडर 19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ ने मोडला आहे. अंतिम सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ ने नवीन पराक्रम आपल्या नावे केला आहे. पृथ्वी 19 वर्षांखालील विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात सहा सामन्यात खेळताना 161 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. या आधी हे विक्रम विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या नावावर होते.
पृथ्वीला आज 19 वर्षांखालील विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी फक्त 14 धावांची गरज होती आणि विराटचा विक्रम मोडण्यासाठी 3 धावांची गरज होती. 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात विराटने 235 धावा केल्या होत्या. तर 2012 मध्ये उन्मुक्त चंदने 246धावा करत विराटचा हा विक्रम मागे टाकला होता. या दोघांनीही सहा सामने खेळले होते. विशेष म्हणजे या दोघांच्याही नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला होता.
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात हा विक्रम केल्यानंतर लगेचच 29 धावांवर असताना पृथ्वीने आपली विकेट गमावली.
भारताच्या पोरांनी जग जिंकलंडावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केलं.