U19 World Cup: कोरोनातून सावरला अन् उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला धुतला; टीम इंडियाच्या Shaik Rasheedचा प्रेरणादायी प्रवास

U19 World Cup: भारतीय संघानं ( India Under 19 team) बुधवारी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:53 PM2022-02-03T12:53:53+5:302022-02-03T12:54:50+5:30

whatsapp join usJoin us
U19 World Cup : Shaik Rasheed, India under 19 team Cricketer know his inspiration story  | U19 World Cup: कोरोनातून सावरला अन् उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला धुतला; टीम इंडियाच्या Shaik Rasheedचा प्रेरणादायी प्रवास

U19 World Cup: कोरोनातून सावरला अन् उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला धुतला; टीम इंडियाच्या Shaik Rasheedचा प्रेरणादायी प्रवास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

U19 World Cup: भारतीय संघानं ( India Under 19 team) बुधवारी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या १२.३ षटकांत २ बाद ३७ असा धावफलक असताना कर्णधार यश धुल ( Yash Dhull) आणि शेख राशिद ( Shaik Rasheed) यांनी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची धुलाई केली. या दोघांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत ५ बाद २९० धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनाही स्पर्धेदरम्यान कोरोना झाला होता आणि त्यातून सावरल्यानंतर पहिलाच सामना खेळताना दोघांनी जबरदस्त खेळ केला. शेख राशिदचा इथवरचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी वडिलांना दोन वेळा नोकरी गमवावी लागली.

अंगक्रीश रघुवंशी ( ६) व हर्नूर सिंग ( १६) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर यश व राशिद यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. यश ११० चेंडूंत १० चौकार १ षटकारासह ११० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिदही १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर बाद झाला. दिनेश बानानं ४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद २० धावा करून संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले. भारतानं अखेरच्या १० षटकांत १०८ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ ऑस्ट्रेलियन फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि ऑस्ट्रेलियन संघ ४१.५ षटकांत १९४ धावा काढून गारद झाला.   भारताकडून डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल याने ४२ धावांत ३ बळी टिपले. तर निशांत सिंधू आणि रवी कुमारने प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

शेख राशिद हा आंध्रप्रदेशच्या गुंटुर जिल्ह्यातून आला आहे. त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी वडिल शेख बलिशावली यांनी खूप मेहनत घेतली. ते त्याला रोज घरापासून ४० किलोमीटर लांब असलेल्या आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीत ट्रेनिंगसाठी घेऊन जायचे. त्याला दोनवेळा नोकरी गमवावी लागली. ते रोज स्कूटरवरून १२ किलोमीटर मैदानात जायचे आणि तेथे मुलाला थ्रो डाऊनचा सराव करून घ्यायचे. त्यानंतर ते दोघं मंगलागिरी येथे जायचे, जे त्यांच्या घरापासून ४० किलोमीटर दूर आहे. येथे तो सराव करायचा, त्यामुळे बलिशावली यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर व्हायचा. त्यामुळे त्यांना ऑटोमोबाईल कंपनीतील नोकरी गमवावी लागली. 


शेख बलिशावली यांनी क्रिकबजला सांगितले की, ''मला दोनवेळा नोकरी गमवावी लागली. प्रत्येक चेंडू ४०० रुपयांची होती आणि किटही महाग होते. त्यामुळे मी त्याला सिंथेटिक चेंडूने थ्रोडाऊन सराव करून घ्यायचो. मी अशी तीन-चार चेंडू घेतले होते.'' राशिदच्या वडिलांचा हैदराबाद येथे राहणाऱ्या मित्रानं स्वतःहून आर्थिक मदत केली होती. राशिदने २०१८-१९ च्या विजय मर्चंट १६ वर्षांखालील स्पर्धेत १६८.५ च्या सरासरीने ६७४ धावा केल्या. त्यात तीन शतकांचा समावेस होता, तर नाबाद २०० ही सर्वोत्तम खेळी ठरली. २०२१-२२च्या वीनू मांकड १९ वर्षांखालील स्पर्धेत त्यानं ६ सामन्यांत ७५च्या सरासरीने ३७६ धावा केल्या. त्याने भारताच्या १९ वर्षांखालील अ संघांचे नेतृत्वही सांभाळले होते. 

Web Title: U19 World Cup : Shaik Rasheed, India under 19 team Cricketer know his inspiration story 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.