Join us  

मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद!

भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या अन् त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता सर्वत्र विदारक चित्रच दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 4:49 PM

Open in App

भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या अन् त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता सर्वत्र विदारक चित्रच दिसत आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट आहे. परिस्थिती बिघडली असतानाही आयपीएल २०२१ आयोजनावरून बीसीसीआयला जाब विचारला जात आहे. पण, परिस्थिती पाहता भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  IPL 2021 : पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार भारताला पर्याय म्हणून संयुक्त अरब अमिराती ( UAE) चा विचार सुरू आहे. जर पुढील सहा महिन्यात देशातील परिस्थिती सुधरली नाही, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत झाल्यास सर्वात जास्त आनंद पाकिस्तान संघाला होणार आहे. ते आधीपासूनच ही स्पर्धा यूएईत खेळवण्याची मागणी करत आहेत. गतवर्षी कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करावी लागली होती. IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज किमान साडेतीन लाख कोरोना रुग्ण सापडत आहेत. भारताच्या तुलनेत यूएईल ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करणे, अधिक सोईचे ठरेल. बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्डाचे चांगले संबंध आहेत आणि मागच्या वर्षी संपूर्ण आयपीएल स्पर्धा येथे खेळवण्यात आली होती.   सर जी तुस्सी ग्रेट हो!; रवींद्र जडेजानं लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं ठेवला आहे. ( Ahmedabad's Narendra Modi Stadium hosting the final) शिवाय दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, धर्मशाला आणि लखनौ येथे वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०बीसीसीआयसंयुक्त अरब अमिराती