Join us  

Video: तुफान राडा! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना अचानक वाद सुरू झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 4:41 PM

Open in App

Fight in Cricket Stadium, ENG vs NZ 3rd Test: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. १ ते ५ जुलै या दरम्यान भारत-इंग्लंड कसोटी सामना रंगणार आहे. पण तत्पूर्वी सध्या इंग्लंडचा संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ २-० ने पुढे आहे. तसेच, तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवसाचा खेळ शिल्लक असून त्यात ८ गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज आहे. इंग्लंडने सामना जिंकल्यास ३-०ने मालिका जिंकून इंग्लंडला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेता येईल. पण सध्या या सामन्याची क्रिकेटविश्वास जी चर्चा रंगली आहे त्याचं कारण वेगळंच आहे.

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली. क्रिकेट सामन्यात एखादा निर्णय पटला नसल्यावर मैदानात पंच किंवा खेळाडूंमध्ये राडा झाल्याचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत. पण या सामन्या दरम्यान थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन तरूणांमध्येच तुफान राडा झाल्याचे दिसून आले. लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात हा सामना सुरू आहे. त्याच मैदानात तरूणांमध्ये अचानक कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या भांडणाचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर या घडलेल्या प्रकारावर नेटकऱ्यांनीही टीका केला. पाहूया काही ट्वीट्स-

--

--

--

दरम्यान, दोन सामन्यात विजय मिळवल्यावर तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात डॅरेल मिचेलच्या १०९ धावांमुळे त्यांना ३२९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या १६२ धावांच्या बळावर ३६० धावा केल्या. तिसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम ब्लंडेल (८८) आणि टॉम लॅथम (७६) यांच्या खेळीच्या जोरावर पाहुण्यांनी ३२६ धावा केल्या व इंग्लंडला २९६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने २ बाद १८३ धावा केल्या.

टॅग्स :सोशल व्हायरलइंग्लंडन्यूझीलंडसोशल मीडिया
Open in App