Umesh Yadav, IPL 2022 KKR vs PBKS Live: उमेश यादवने फिरवला 'गेम' पण Kagiso Rabada च्या फटकेबाजीने राखली पंजाबची लाज; कोलकाताला विजयासाठी १३८ धावांचं आव्हान

कगिसो रबाडाच्या फटकेबाजीमुळे कसाबसा ओलांडला १३०चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 09:16 PM2022-04-01T21:16:39+5:302022-04-01T21:18:58+5:30

whatsapp join usJoin us
Umesh Yadav Shines in IPL 2022 KKR vs PBKS match by taking 4 Wickets Kagiso Rabada Counter Attack KKR need 138 Runs To Win Suhana Khan Aryan Khan | Umesh Yadav, IPL 2022 KKR vs PBKS Live: उमेश यादवने फिरवला 'गेम' पण Kagiso Rabada च्या फटकेबाजीने राखली पंजाबची लाज; कोलकाताला विजयासाठी १३८ धावांचं आव्हान

Umesh Yadav, IPL 2022 KKR vs PBKS Live: उमेश यादवने फिरवला 'गेम' पण Kagiso Rabada च्या फटकेबाजीने राखली पंजाबची लाज; कोलकाताला विजयासाठी १३८ धावांचं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Umesh Yadav, IPL 2022 KKR vs PBKS Live: कोलकाता विरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची अक्षरश: तारांबळ उडाली. कोलकाताच्या उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबचा डाव १३७ धावांतच आटोपला. कगिसो रबाडाच्या २५ आणि भानुका राजपक्षेच्या ३१ धावांमुळे पंजाबने कसाबसा १३०चा टप्पा ओलांडला. उमेश यादवने अप्रतिम गोलंदाजी करत २३ धावांत ४ बळी टिपले.

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली. शिखर धवन (१६), लियम लिव्हिंगस्टोन (१९), राज बावा (११), शाहरूख खान (०) आणि हरप्रीत ब्रार (१४), राहुल चहर (०) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले.

रबाडाच्या फटकेबाजीने राखली लाज

भानुका राजपक्षेने ९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासोबत ३१ धावा केल्या. कगिसो रबाडाला पंजाबकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने दमदार कामगिरी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात मोठी भूमिका बजावली. रबाडाने १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत २५ धावांची उपयुक्त खेळी केली.

सामन्यात स्टारकिड्सचं चीअर

यंदाच्या IPL मध्ये बॉलिवूड स्टारकिड्स स्टेडियममध्ये आपल्या आवडत्या संघाला चीअर करायला आणि सामना पाहायला आल्याचं दिसतंय. KKRच्या पहिल्या सामन्यात शाहरूखचा मुलगा Aryan Khan याने हजेरी लावली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात त्याच्यासोबत शाहऱुखची मुलगी Suhana Khan आणि चंकी पांडेची मुलगी व बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांनी वानखेडे मैदानावर उपस्थिती लावल्याचं दिसलं. त्यांचे स्टेडियममधील फोटो झटपट व्हायरल झाल्याचंही दिसून आलं.

पंजाब किंग्ज: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लिव्हिंगस्टोन, बी राजपक्षे (विकेटकीपर), ओडियन स्मिथ, एस खान, आर बावा, ए सिंग, एच ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चहर.

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), सुनील नरिन, शिवम मावी, टीम साऊदी, यू यादव, वरूण चक्रवर्ती.

Web Title: Umesh Yadav Shines in IPL 2022 KKR vs PBKS match by taking 4 Wickets Kagiso Rabada Counter Attack KKR need 138 Runs To Win Suhana Khan Aryan Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.