नागपूर : वरिष्ठ खेळाडू या नात्याने भविष्यात संघातील स्थान कायम राखण्यासाठी मला व मोहम्मद शमीला अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, असे भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले. उमेश सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करत आहे. परंतु, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्यासह, शमी संघातील स्थान कायम राखण्यात अपयशी ठरत आहेत. सध्या सुरु असलेल्या आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेत उमेश - शमी यांच्या जागी भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांना संधी देण्यात आली होती.
उमेशने म्हटले की, ‘बंगळुरु येथे झालेल्या पराभवानंतर संघाच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. माझ्यामते आम्ही १५-२० धावा जास्त दिल्या. शमी आणि मी मोठ्या कालावधीनंतर खेळत होतो. पण, वरिष्ठ खेळाडू असल्याने आम्हाला संघात स्थान कायम मिळवण्यासाठी अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. विशेष करुन डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला चांगला मारा करावा लागेल.’
कसोटी क्रिकेटविषयी उमेश म्हणाला, ‘एकदिवसीयच्या तुलनेत मला कसोटी सामना खेळणे आवडतं. कसोटीमध्ये आपल्या योजना यशस्वी करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. पाच दिवसांदरम्यान आपल्याकडे विविध परिस्थिती असतात आणि मला हे आव्हान आवडतं. यामुळे आत्मविश्वास उंचावतो.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Umesh Yadav will have to do well in the last over, with responsibility for Shami - Umesh Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.